Mr. And Mrs Mahi Trailer : स्पोर्ट्स, ड्रामा आणि रोमान्स... 'मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
Mr. And Mrs Mahi Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mr And Mrs Mahi Collection : ‘मिस्टर अँड मिसेज माही’ला क्रिकेटप्रेमींकडून दमदार प्रतिसाद, जान्हवी कपूर आणि राजकुमार रावच्या अभिनयाची जोरदार चर्चा

Chetan Bodke

जान्हवी कपूर आणि राजकुमार राव स्टारर ‘मिस्टर अँड मिसेज माही’ चित्रपट ३१ मे रोजी थिएटरमध्ये बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण दुसऱ्या दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाला दुसऱ्या दिवशी म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही, जाणून घेऊया दुसऱ्या दिवसाच्या कमाईबद्दल.

क्रिकेट आणि रोमान्सचे ट्विस्ट असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. चित्रपटाला पहिल्या दिवशी सकारात्मक प्रतिसाद मिळालेला असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी संमिश्र प्रतिसाद मिळालेला आहे. पहिल्या दिवशी ७ कोटींची कमाई केली असून दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ४ कोटींच्या आसपासची कमाई केलेली आहे. ४० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट येत्या रविवारी म्हणजेच विकेंडला किती कोटींची कमाई करणार, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

'मिस्टर अँड मिसेस माही'चे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले आहे. चित्रपटाच्या कथेत क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या कपलची स्टोरी दाखवली आहे. हा चित्रपट एक अयशस्वी क्रिकेटर आपल्या पत्नीला तिची स्वप्ने पूर्ण करण्यास कशी मदत करतो यावर आधारित आहे. राजकुमार राव आणि जान्हवी कपूरसह प्रमुख भूमिकेत कुमुद मिश्रा, अभिषेक बॅनर्जी, जरीना वहाब आणि राजेश शर्मा सारखे अनेक कलाकार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण अडचणींच्या सापळ्यात; सर्व्हर डाऊनमुळे लाडक्या बहिणींचा हिरमोड

Ladki Bahin Yojana: साम टीव्हीच्या बातमीचा दणका! लाडक्या बहिणींची लूट करणाऱ्या तलाठ्यावर निलंबनाच्या कारवाईनंतर थेट FIR दाखल

Spider-Man Thief: मुंबईत 'स्पायडर मॅन' चोर! उंच इमारतींवर चढून करायचा चोरी; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Leopard Sterilisation: वन्यजीव-मानव संघर्ष वाढणार? बिबट्यांच्या नसबंदीला केंद्राचा नकार, जुन्नरकरांचं टेंशन वाढलं

Legislative Assembly Elections: विधान परिषद निवडणुकीच्या धुमाळीत ५:२५ ची चर्चा; काय आहे ५:२५ चा आकडा?

SCROLL FOR NEXT