Jaya Bachchan And Abhihek Bachchan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jaya Bachchan: जया बच्चन यांचा वेबसीरिजला नकार, 'अभिषेकची वेबसीरिज पाहण्यापेक्षा...'; पण अमिताभ यांना....

जेष्ठ अभिनेत्री जया बच्चन ही वेबसीरिज पाहण्यासाठी काहीच उत्सुक नाहीत असे दिसत आहे. त्या एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना बोलत होत्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Breathe: into the shadows: ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन या नेहमीच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असतात. नुकत्याच त्या भरपूर ट्रोल झाल्या होत्या. त्यांनी त्यांची नात नव्या नवेलीला एक सल्ला दिला होता. त्यावरून त्या बऱ्याच ट्रोल झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा त्यांना ट्रोलधाडीचा सामना करावा लागणार आहे. त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन सध्या एका वेबसीरिजमुळे बरेच चर्चेत आहे.

वेबसीरिज नुकतीच 'अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ' वर ती वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे. ‘ब्रीद : इनटू द शॅडोज’ (Breathe: into the shadows) या वेब सीरिजला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

या वेबसीरिज मध्ये मुख्य भूमिकेत अभिषेक बच्चन, नित्या मेनन, अमित साध आणि सैयामी खेर हे कलाकार झळकणार आहेत. 2020 मध्ये ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. त्या वेबसीरिजच्या माध्यमातून त्याने ओटीटीमध्ये पदार्पण केले होते. एकाच वेळी दुहेरी भूमिका केल्याने त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. अभिषेकचे चाहते या सीरिजच्या आगामी सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.

या सीरिजचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित झाला असून त्यात, ऍक्शन सिक्वेन्सने भरपूर अशा या ट्रेलरमध्ये अभिषेक बच्चनचे पात्र उर्वरित ६ बळी मिळवण्यासाठी परत आले आहे. प्रेक्षक अभिषेकच्या या नव्या भूमिकेसाठी उत्सुक आहेत. पण त्याची आई म्हणजे जया बच्चन ही वेबसीरिज पाहण्यासाठी काहीच उत्सुक नाहीत असे दिसत आहे. त्या एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना बोलत होत्या.

यावर अभिषेक बोलतो, 'आम्ही प्रेक्षकांसमोर एक उत्तम थ्रिलर आणला आहे, पण माझ्या आईलाच ते पाहण्याचीच इच्छा नाही. तिला थ्रिलर गोष्टी आवडत नाही आणि आईला त्या गोष्टींची भीती वाटते. आई अशा गोष्टी पाहण्यापेक्षा संसदेत जाणे पसंद करेल.' पण वडिलांना अभिषेकची ही सीरिज चांगलीच आवडली आहे आणि याचा पहिला सीझन त्यांनी सलग पाहिला होता हेदेखील अभिषेकने स्पष्ट केलं आहे.

दिग्दर्शक मयंक शर्मा यांनी अर्शद सय्यद, विक्रम तुली, प्रिया सग्गी आणि अभिजित देशपांडे यांच्यासोबत ‘ब्रीद: इनटू द शॅडोज’च्या नवीन सीझनचे सह-लेखन केले आहे. ‘ब्रीद: इनटू द शॅडो सीझन २’ ९ नोव्हेंबर रोजी २४० देशात प्रसारित होणार आहे. अभिषेक बच्चनच्या या नवीन सीरिजसाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय; अंतिम सामन्यात पाकिस्तानशी महामुकाबला

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

Maharashtra Government: मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेती कर्ज वसुलीला स्थगिती

SCROLL FOR NEXT