Nusrat Jahan On Pathaan Movie Controversy  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathan Controversy: बिकिनीवर सुद्धा आक्षेप आणि हिजाबवर पण... तृणमूलच्या खासदार भाजपवर कडाडल्या

तृणमूलच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहां यांनी सुद्धा भाजपवर निशाणा साधला आहे.

Pooja Dange

Nusrat Jahan On BJP: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोन यांचा 'पठान' या चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटावरून अनेक वाद निर्माण करण्यात येत आहेत. 'पठान' चित्रपटातील 'बेशरम रंग' गाणे प्रदर्शित झाल्यानंतर दीपिकाच्या भगव्या रंगाच्या कपड्यांवरून वाद पेटला आहे. दीपिकाच्या भगव्या रंगाच्या कपड्यांमुळे हिंदूंच्या भावना दुखवल्याचा टीका या चित्रपटावर करण्यात येत आहे.

'पठान' चित्रपटातील वादावर अनेक राजकीय नेते तसेच बॉलिवूड कलाकार त्याच्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच भाजपच्या अनेक नेत्यांनी या चित्रपटातील सीन बदलण्याचा मागणी केली आहे. आता यात तृणमूलच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहां यांनी सुद्धा भाजपवर निशाणा साधला आहे. नुसरत यांनी ट्विट करत त्यांचे म्हणणे मांडले आहे. नुसरत यांनी एक मुलाखतीमध्ये म्हटले होते की, त्यांना महिलांच्या हिजाबवर सुद्धा आक्षेप आहे, 'त्यांना महिलांनी बिकिनीवर सुद्धा आक्षेप आहे. हे तेच लोक आहेत जे नव्या युगातील महिलांना काय घालावे हे सांगत आहेत.' (Bollywood)

'काय परिधान करावे, काय खावे, कसे बोलावे, कसे चालावे, शाळेत काय शिकले पाहिजे, टीव्हीवर काय पाहावे हे सांगून ते आपले जीवन नियंत्रित करणायचा प्रयत्न करीत आहेत. ते याला नवीन, विकसित भारत म्हणतात. हे खूप भीतीदायक आहे. मला भीती वाटते की काही वर्षांनी हे आपल्या सर्वांना कुठे नेऊन ठेवतील हे मला माहित नाही. (Celebrity)

हे कोणत्याही विचारसरणीशी संबंधित नाही. हे सत्तेत असलेल्या एका पक्षाविषयी आहे, जे लोकांमध्ये चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच लोक जे काही करत आहेत, ते काही अध्यात्मिक, धार्मिक नाही, फक्त एक विचारपूर्वक केलेले षडयंत्र आहे. त्यामुळे ते संस्कृतीबद्दल, बिकिनी घालणाऱ्या महिलांबद्दल बोलत आहेत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EIL Recruitment: इंजिनियर झालात? या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, पगार २ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

Aditya Roy Kapoor : व्हायचं होतं क्रिकेटर, झाला अभिनेता; एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले

Sangli Politics: बंटी पाटलांसारखं वागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही, विश्वजीत कदम यांनी पवारांच्या राष्ट्रवादीला खडसावलं

Maharashtra Election : टपाली मतपत्रिकेचा फोटो गावाकडं व्हॅट्सअॅप पाठवला, पोलिसावर गुन्हा दाखल

Weight And Height Chart: तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे? पाहा संपूर्ण चार्ट

SCROLL FOR NEXT