Tejas Teaser Shared On Social Media Instagram
मनोरंजन बातम्या

Tejas Teaser Released: ‘भारत को छेडोगे तो छोडेंगे नही...’, कंगना रणौतच्या ‘तेजस’चा धडाकेबाज टीझर रिलीज

Kangana Ranaut Tejas Teaser: कंगना रणौतच्या ‘तेजस’चा सोशल मीडियावर टीझर प्रदर्शित झाला आहे.

Chetan Bodke

Tejas Teaser Shared On Social Media

‘चंद्रमुखी २’ नंतर बॉलिवूडची पंगा गर्ल आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. ‘टिकू वेड्स शेरु’ आणि ‘चंद्रमुखी २’ला चाहत्यांकडून फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी, कंगनाचे आगमी चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत आहे. येत्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये कंगना रणौतचे ‘इमरजेन्सी’ आणि ‘तेजस’ हे दोन्हीही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी कंगनाच्या ‘तेजस’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. घोषणेनंतर चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

०५ जुलैला कंगना रणौतचा ‘तेजस’ मधील लूक प्रदर्शित झाला होता. लूकसोबतच तिने सोशल मीडियावर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. कंगना चित्रपटामध्ये वैमानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. RSVP निर्मित ‘तेजस’च्या काही सेकंदाच्या टीझरमध्ये अभिनेत्री खूपच डॅशिंग दिसतेय. टीझरच्या सुरुवातीला, कंगना एअरफोर्स पायलटच्या ड्रेसमध्ये दिसून येतेय. त्यासोबतच तिच्या जबरदस्त डायलॉगने सर्वांचेच लक्ष वेधलेय.

टीझरमध्ये ‘भारत को छेडोगे तो छोडेंगे नही.’ या वाक्याने अवघ्या देशाचे लक्ष वेधलेय. अभिनेत्रीचा ॲक्शन अवतार पाहून अंगावर शहारे येत आहे. ‘तेजस’ मध्ये कंगना आणि वरुण मित्रा यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे.

सर्वेश मेवाडा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कथेचे लिखाण केले आहे. हा चित्रपट २०२२ मध्ये ओटीटीवर प्रदर्शित होणार होता. पण हा चित्रपट आता थिएटरमध्येच प्रदर्शित होणार आहे. भारतीय हवाई दलातील महिला पायलटची कथा चित्रपटात दाखवली आहे.

चित्रपटामध्ये कंगना जबरदस्त ॲक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटात कंगना व्यतिरिक्त अंशुल चौहान, वरुण मित्रा आणि पंकज त्रिपाठी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी केली आहे.

कंगना रनौतच्या एकूण कामाबद्दल बोलायचे तर, कंगना ‘चंद्रमुखी २’मुळे तर चर्चेत आहेच, पण ती लवकरच ‘तेजस’ आणि ‘इमरजेन्सी’ या दोन चित्रपटांमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. २८ सप्टेंबरला कंगनाचा ‘चंद्रमुखी २’ हा पॅन इंडिया सिनेमा हिंदी, तामिळ,तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला. ‘इमरजेन्सी’ चित्रपटामध्ये कंगनाने स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं पात्र साकारलं आहे. कंगनानेच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची आणि निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Dasara Melava Live Update: संगमनेरमधील मुस्लिम मावळा दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर दाखल

Bhaskar Jadhav: टीका करणारे डल्लेखोर, तकलादू आणि भाडेकरू, भास्कर जाधवांचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

Swollen Face: सकाळी उठल्यानंतर चेहरा सुजलेला का दिसतो?

Instagram Ads : तुम्ही काय बोलता हे सर्व इंस्टाग्राम गुपचूप ऐकतं का? अ‍ॅडम मोसेरीने सगळं खरं खरं सांगितलं

Shocking: दसरा सणाला गालबोट! दुर्गा देवीच्या विसर्जनादरम्यान अनर्थ घडला, ६ जण नदीत बुडाले

SCROLL FOR NEXT