Tejas Film Declared Release Date Instagram
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut Tejas Film: बहुप्रतिक्षित ‘तेजस’च्या प्रदर्शनाची तारीख आली समोर; पंगा गर्ल साकारणार पायलटची भूमिका, Photo Viral

Kangana Ranaut New Film: ‘टिकू वेड्स शेरू’नंतर कंगनाचा आणखी एक आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Chetan Bodke

Tejas Film Declared Release Date: बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौत सध्या तिच्या चित्रपटांमुळे कमालीची चर्चेत आली आहे. ‘टिकू वेड्स शेरू’नंतर कंगनाचा आणखी एक आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या सोबतच कंगनाचा ‘इमरजेन्सी’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. दरम्यान पंगा गर्लचा ‘तेजस’ (Tejas) या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे.

कंगना रणौतच्या आगामी ‘तेजस’ चित्रपटातील तिचा लूक फारच चर्चेचा विषय ठरला आहे. लूकसोबतच तिने सोशल मीडियावर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. कंगनाने शेअर केलेल्या फोटोत ती स्वत: वैमानिकाच्या भूमिकेत दिसून येत आहे. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा उत्साह आणि तिची स्टाईल चाहत्यांना फारच भावली आहे. कंगनाने शेअर केलेल्या पहिल्या फोटोत, ती एका वैमानिकाच्या भूमिकेत दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत कंगना एका ॲक्शन सीनमध्ये दिसत आहे.

सर्वेश मेवाडा दिग्दर्शित चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांच्या आरएसव्हीपी मुव्हीजच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. हा चित्रपट सर्वात आधी २०२२ मध्ये प्रदर्शित होणार होता. पण हा चित्रपट पूर्वी ओटीटीवर प्रदर्शित होणार होता. पण आता तो चित्रपट, ओटीटीवर प्रदर्शित न होता थेट चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार आहे. कंगनाने या चित्रपटाचा पोस्टर शेअर करताना कॅप्शन दिले की,“हवाई दलाच्या वैमानिकांच्या शौर्याचा सन्मान. 20 ऑक्टोबरला ‘तेजस’ प्रदर्शित होणार.”

कंगनाचा हा चित्रपट वैमानिक तेजस गिलवर आधारित आहे. सर्वेश मेवाडा यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून त्यांनीच चित्रपटाच्या कथेचेही लिखाण केलंय. भारतीय हवाई दलातील महिला पायलटची कथा चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात कंगना जबरदस्त ॲक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटात कंगना व्यतिरिक्त अंशुल चौहान, वरुण मित्रा आणि पंकज त्रिपाठी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी केली आहे.

कंगना रनौतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, सध्या अभिनेत्री ‘तेजस’ चित्रपटामुळे तर चर्चेत आहेच, पण ती ‘चंद्रमुखी २’ आणि ‘इमरजेन्सी’ या दोन चित्रपटांमुळे देखील ती चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. ‘चंद्रमुखी २’ हा पॅन इंडिया सिनेमा असून हिंदी, तामिळ,तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

एकूणच सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे तिनही महिने कंगनासाठी आणि तिच्या चाहत्यांसाठी खास असणार आहेत. ‘इमरजेन्सी’ या चित्रपटात कंगनाने स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं पात्र साकारलं आहे. कंगनानेच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची आणि निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijaya Divas: 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठीत, आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार'; उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

Raj thackeray: आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #$@डू आहोत असा गैरसमज नको, राज ठाकरे कडाडले

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

SCROLL FOR NEXT