Raj Thackeray On Nitin Desai Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raj Thackeray On Nitin Desai Death: नितीन देसाईनं आत्मघातकी विचार का केला असेल? राज ठाकरे हळहळले

Priya More

Nitin Desai Death Case : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Marathi Director Nitin Desai ) यांनी आत्महत्या केली. कर्जतच्या एन.डी स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास लावून आत्महत्या (Nitin Desai Death Case) केली. त्यांच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडसह मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉलिवूडसह मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि अनेक राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Leader Ajit Pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar( यांनी देखील नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर दु:ख व्यक्त केले आहे.

राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'ज्येष्ठ कलादिगदर्शक आणि माझे स्नेही नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झालं. जवळपास ३० वर्षे हिंदी चित्रपटांच्या जगात एका मराठी कलाकाराने जी भव्यता आणि नजाकत उभी केली त्याला तोड नाही. कला दिग्दर्शकाच्या दृष्टीचा पैस हा मोठाच असावा लागतो आणि असा पैस असलेला माणूस आयुष्यात एका क्षणाला कमकुवत होतो, त्याला आयुष्यात पुढे काहीच दिसेनासं आणि तो इतका टोकाचा निर्णय घेऊ शकतो, हे अनाकलनीय आहे.'

'नितीन हा धीराचा माणूस होता, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाणारा माणूस होता, त्यामुळे त्याने असा आत्मघातकी विचार का केला असेल? त्याच्यावर ही वेळ कशामुळे आली असेल ह्याचा छडा लागला पाहिजे. असो, कोणावरही अशी वेळ येऊ नये हीच इच्छा. नितीन देसाईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली.', अशी पद्धतीने राज ठाकरे यांनी नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अजित पवार यांनी सांगितले की, 'कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येची बातमी ऐकून धक्का बसला. महाराष्ट्राच्या कला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेकांशी निकटचे, मित्रत्वाचे संबंध असलेल्या नितीन देसाईंचं अशा पद्धतीनं अचानक निघून जाणं अनाकलनीय, अविश्वसनीय, मनाला चटका लावणारं आहे.

नितीन देसाई कलादिग्दर्शनाच्या क्षेत्रात सर्वोच्चस्थानी होते. कलादिग्दर्शक असण्याबरोबरंच निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते म्हणूनही त्यांनी कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. '1942 अ लव्ह स्टोरी', 'हम दिल दे चुके सनम', 'माचिस', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर' यांसारख्या सुपरहिट सिनेमाचे कला दिग्दर्शन केले.'

'चारवेळा सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. जागतिक दर्जाच्या एनडी स्टुडीओ निर्मितीतून सौंदर्यदृष्टीचं, कलागुणांचं, ध्येयवेडाचं दर्शन घडवलं. हिन्दी चित्रपटसृष्टी आणि कलेच्या क्षेत्रात नितीन देसाईंसारखा मराठी तरुण आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करुन आहे, याचा महाराष्ट्राला अभिमान होता. महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक उपक्रमाला त्यांचं मनापासूनचं सहकार्य असायचं. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवाच्या आयोजनात त्यांनी सर्वस्व झोकून काम केलं.'

अजित पवार यांनी पुढे असे देखील सांगितलं की, 'प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर होणाऱ्या संचालनात महाराष्ट्राचा चित्ररथ तयार करण्यात त्यांची नेहमीच मदत व्हायची. हिन्दी चित्रपटसृष्टीसारख्या झगमगाटात राहूनही त्यांचं वागणं साधं, विनम्र होतं. त्यांच्या निधनानं भारतीय कलासृष्टीचं, महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. नितीन देसाईंच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो.', अशी शब्दात त्यांनी नितीन देसाईंना श्रद्धांजली वाहिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय, मराठवाडा-विदर्भात जोरदार पाऊस होणार; या जिल्ह्यांना अलर्ट

Rashi Bhavishya today : मनातील भावना जोडीदाराला शेअर कराल; तुमची रास यात आहे का?

Horoscope Today : भाग्य फळफळणारा आजचा दिवस, मामाच्या संमिश्र गोष्टी कानावर येतील; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

SCROLL FOR NEXT