मिथुन चक्रवर्ती Wikimedia Commons
मनोरंजन बातम्या

वादग्रस्त वक्तव्या संबंधी मिथुन चक्रवर्ती यांची केली चौकशी

पश्चिम बंगालच्या (West Bengal) निवडणुकीच्या प्रचार सभेच्या दरम्यान बॉलीवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी केलेल्या वादग्रस्त भाषणाच्या बाबतीत आज पश्चिम बंगाल पोलिसांनी त्यांची आभासी (Virtually) चौकशी केली आहे

वृत्तसंस्था

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या (West Bengal) निवडणुकीच्या प्रचार सभेच्या दरम्यान बॉलीवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी केलेल्या वादग्रस्त भाषणाच्या बाबतीत आज पश्चिम बंगाल पोलिसांनी त्यांची आभासी (Virtually) चौकशी केली आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या अगोदर मिथुन यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये (BJP) प्रवेश केला होता. वादग्रस्त भाषणाच्या बाबतीत मिथुन यांच्या विरोधात मानिकलता पोलिस स्टेशनमध्ये केस नोंदवली होती. एफआयआर रद्द करण्यासाठी मिथुन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच अनुशंगाने उच्च न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना मिथुन यांची आभासी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, मिथुन यांनी मार्चमध्ये कोलकाता येथे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. मिथुन यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच ममतांची पार्टी तृणमूल कॉंग्रेस सरकारविरूद्ध कठोर भूमिका घेतली होती. ब्रिगेड मैदानावरील रॅलीच्या मंचावरुन ते म्हणाले होते की, "मैं एक नंबर का कोबरा हूं.. डसूंगा तो तुम फोटो बन जाओगे." मिथुन यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाच्या अगोदर सभेला अशाच वक्तव्यांनी संबोधित केले होते. मिथुन म्हणाले होते '' मला बंगाली असण्याचा अभिमान आहे. मला माहित आहे तुम्हाला माझे डायलॉग आवडतात''. त्यंनी एका चित्रपटाच्या डायलॉगचा उल्लेखही केला होता. (Mithun Chakraborty questioned over controversial statement)

हे देखिल पहा

मिथुन यापूर्वी तृणमूल कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार देखील होते. पश्चिम बंगाल निवडणुकीत सर्व प्रयत्न करूनही तृणमूल कॉंग्रेसला सत्तेपासून दूर करण्यात भाजपा यशस्वी होऊ शकला नाही. २०० हून अधिक जागा जिंकून टीएमसी राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्तेत आली आहे.

Edited By : Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चतुरस्र अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; चित्रपटसृष्टीवर शोककळा, ५ दशकांत ६०० हून अधिक चित्रपटांत केलं होतं काम

Maharashtra News Live Update: Mumbai: रायगडच्या खालापुरमध्ये लागल्या वाहनांच्या रांगा

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

SCROLL FOR NEXT