Harnaaz Kaur Sandhu Instagram @harnaazsandhu_03
मनोरंजन बातम्या

Miss Universe 2022: हरनाज कौर सिंधूच्या ड्रेसची जगभर चर्चा, या दोन अभिनेत्रींचे छापले होते फोटो

हरनाज कौर सिंधूच्या ड्रेसवर दोन भारतीय महिलांचा फोटो होता.

Pooja Dange

Harnaaz Kaur Sandhu's Tribute To Sushmita Sen -Lara Dutta: अमेरिकेच्या आर बोनी ग्रॅब्रियलला मिस युनिव्हर्स २०२२ होण्याचा बहुमान मिळाला आहे. मिस युनिव्हर्सचा मुकुट तिला प्रदान करण्यासाठी माजी मिस युनिव्हर्स कार्यक्रमाला उपस्थित राहिली होती. हरनाज कौर सिंधूने सर्वांना अभिवादन करताच तिच्यावर टाळ्यांचा वर्षाव झाला हे पाहून ती खूप भावुक झाली होती. परंतु या सगळ्यात तिच्या ड्रेसने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. तिचा ड्रेस खूप युनिक होता.

माजी मिस युनिव्हर्स हरनाजच्या ड्रेसवर दोन खास महिलांचा फोटो होता. ते फोटो पाहून सगळ्यांच्या नजरा तिच्या ड्रेसकडे वळल्या होत्या. हरनाजच्या स्पेशल दोन महिलांना यानिमित्त ट्रिब्यूट दिले. या दोन महिलांनी यापूर्वी भारतचे जगात उंचावले आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दोन महिला आहेत तरी कोण? हरनाजच्या ड्रेस वर एका बाजूला होती मिस युनिव्हर्स १९९४ सुष्मिता सेन आणि दुसऱ्या बाजूला होती मिस युनिव्हर्स २००० लारा दत्ता. (Actress)

हरनाजने तिच्या ड्रेस माध्यमातून या दोघींना ट्रिब्यूट दिला असे म्हटले तर काही वावगं ठरणार नाही. तिच्या या ड्रेसने सर्वांचे मन जिंकले आहे. ट्विटरवर सुद्धा अनेकजण तिच्या या ड्रेसचे कौतुक करत आहेत. अनेकांचे म्हणणे आहे की, आंतराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या कार्यक्रमाला जाण्यासाठी यापेक्षा उत्तम ड्रेस असूच शकत नाही.

हरनाजने मिस युनिव्हर्स २०२२च्या अंतिम सोहळ्यासाठी घातलेल्या लूकविषयी बोलायचे झाले तर तिने काळ्या रंगाचा गाऊन घातला होता. हेवी फ्लो मटेरियलपासून तिचा हा गाऊन बनविण्यात आला होता. हरनाजचे केस मोकळे आहे वेव्ही होते. तसेच हरनाजने स्मोकी आणि ब्रॉन्ज मेकअप केला होता. हरनाजचा ड्रेस साई शिंदेने डिझाईन केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT