Milind Soman  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Milind Soman Birthday: तो ५२ आणि ती २५, मिलिंद-अंकिताचं मन कसं जुळलं, दोघांची लव्हस्टोरीबद्दल माहितेय?

Milind Soman Lovestory: मिलिंद सोमणने २५ वर्षीय लहान मुलींशी लग्न केले आहे. मिलिंद आणि अंकिताची लव्हस्टोरी युनिक आहे.

Manasvi Choudhary

नव्वदच्या दशकातील लोकप्रिय मराठमोळा अभिनेता मिलिंद सोमण आज त्याचा ५९ वा वाढदिवस साजरा करत आहे. फिटनेस फ्रिक म्हणून मिलिंद सोमणची खास ओळख आहे. याशिवाय सोमण कायमच त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिला आहे. मिलिंद सोमणने २५ वर्षीय लहान मुलींशी लग्न केले आहे. मिलिंद आणि अंकिताची लव्हस्टोरी युनिक आहे.

अंकिता आणि मिलिंदची भेट एका नाईट क्लबमध्ये झाली. या नाईट क्लबमध्ये दोघांनी एकमेकांना नजरेत कैद केले. यानंतर शेवटी अंकिताने मिलिंदला डान्स करण्यासाठी विचारले. यावर मिलिंदने देखील होकार दिला. यानंतर या दोघांनी बराच वेळ एकमेकांसोबत घालवला. मनसोक्त डान्स केल्यानंतर मिलिंदने अंकिताकडे तिचा नंबर मागितला. नंतर दोघेही एकमेकांशी फोनवर बोलू लागले. दोघांची चांगली मैत्री झाली. काही दिवसांत या दोघांची मैत्री इतकी घट्ट झाली की दोघांना एकमेकांशी बोलल्याशिवाय जमायचे नाही.

यानंतर अंकिताच्या आयुष्यात एक दुर्देवी प्रसंग आला तो म्हणजे तिच्या प्रियकराचा मृत्यू झाला. ज्यामुळे तिच्या आयुष्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. या दु:खामुळे अंकिताला मिलिंदने धीर दिला. तिची साथ सोडली नाही. तिला समजवण्यात त्याची मोठी साथ मिळाली. या दुखातून त्याने तिला बाहेर काढले. एक मित्र म्हणून मिलिंदने तिला चांगला धीर दिला. यानंतर अंकिताची मैत्री आणखी घट्ट झाली. दोघेंही एकमेकांना भेटू लागले. मिलिंदच्या मनात अंकिताबद्दल प्रेम निर्माण झाले. त्याने तिच्याजवळ भावना व्यक्त केल्या.

यानंतर मिलिंद आणि अंकिताने ५ वर्षे एकमेकांना डेट केले. नंतर २२ एप्रिल २०१८ मध्ये हे दोघे लग्नबंधनात अडकले. यावेळी मिलिंदचे वय ५२ होते तर अंकिता फक्त २६ वर्षाची होती. या दोघांच्या वयातील अंतरावरून सोशल मीडियावर यांना चांगलच ट्रोल करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळी गोड! मोदी सरकारकडून महाराष्ट्राला 1 हजार 566 कोटींचा निधी|VIDEO

PMC Bonus: पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! सातव्या वेतन आयोगाच्या फरकासह बोनस जाहीर

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

Success Story: इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉय ते बिझनेसमॅन, बीडच्या लेकाने उभारली स्वतःची कंपनी; Canvaला देतेय टक्कर

Diwali 2025: 800 वर्षांनंतर दिवाळीला बनणार 5 राजयोग; 'या' 3 राशी रातोरात होणार श्रीमंत

SCROLL FOR NEXT