Marathi Web Series, Latest Web Series To Watch, Marathi Web Series, New Marathi web Series Watch Online Saam Tv
मनोरंजन बातम्या

'मी पुन्हा येईन'... सत्तेचा घोडेबाजार दाखवणाऱ्या वेब सीरीजचा टीझर पाहा

अभिनेता भारत गणेशपुरे सिरीजमध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या काही दिवसांत मोठे भूकंप पाहिले आहेत. शेवटपर्यंत कुणालाच माहिती नव्हतं की काय होईल, एखाद्या सस्पेंस चित्रपटापेक्षा काही जबरदस्त असा क्लायमॅक्स सगळ्यांनी पाहिला. राजकीय घडामोडींच्या या पार्श्वभूमीवर 'मी पुन्हा येईन' नावाची वेबसीरिज तुमच्या भेटीला येणार आहे. अरविंद जगताप (Arvind Jagtap) यांचं लिखाण आणि दिग्दर्शन असलेल्या या वेब सीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठी, गौतम कोळी आणि जेम क्रिएशन्सने केली आहे.

नुकतचं या वेबसिरीजचा (Web Series) टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिनेता भारत गणेशपुरे सिरीजमध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. भारत गणेशपुरेला (Bharat Ganeshpure) 'मी पुन्हा येईन', असं म्हणताना पाहून चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. (Latest Marathi Web Series)

दोन पक्षाचे नेते सत्तेसाठी आमदारांची कशी पळवापळवी आणि फोडाफोडी करत आहेत हे या वेब सीरिजच्या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर शासकीय यंत्रणांचाही कसा वापर केला जातो आणि यात अधिकारीवर्गही आपली पोळी कशी भाजून घेतात, हे पहायला मिळत आहे.

या वेब सीरिजमध्ये उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे,सयाजी शिंदे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, दिप्ती क्षीरसागर रुचिका जाधव आणि सीमा कुलकर्णी हे झळकणार आहेत. (Latest Marathi News Update)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT