Influencer Death saam tv
मनोरंजन बातम्या

Influencer Death : धक्कादायक! Live स्ट्रीमिंग दरम्यान प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची गोळ्या झाडून हत्या

Social Media Influencer Killed : प्रसिद्ध सोशल मिडिया इन्फ्लुएन्सरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इन्फ्लुएन्सरची गोळ्या झाडून हत्या

सोशल मिडिया हादरले

Live स्ट्रीमिंग दरम्यान इन्फ्लुएन्सरला मारले

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मेक्सिकन सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर सीझर गॅस्टेलमची सिनालोआ येथील कुलियाकानमध्ये लाइव्ह-स्ट्रीमिंग करत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या बातमीने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सीझर गॅस्टेलम हा २३ वर्षीय कंटेंट क्रिएटर एका फास्ट-फूड दुकानाबाहेर आपल्या मित्रांसोबत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. लाइव्ह-स्ट्रीमच्या रेकॉर्डिंगमध्ये, मोटारसायकल चालवणारी व्यक्ती गॅस्टेलमवर गोळीबार करताना दिसत असल्याचे वृत्त आहे. या टिकटॉक स्टारचे जवळपास ६,००,००० फॉलोअर्स होते आणि तो विनोदी व्हिडिओ बनवण्यासाठी ओळखला जात असे.

ही गोळीबाराची घटना वायव्य मेक्सिकोमधील सिनालोआची राजधानी आणि सर्वात मोठे शहर असलेल्या कुलियाकानमध्ये घडली. गॅस्टेलमच्या लाइव्ह-स्ट्रीममधील फुटेजमध्ये मोटारसायकल चालक त्या इन्फ्लुएन्सरवर गोळीबार करताना दिसत होता. तो आपल्या फॉलोअर्ससाठी लाइव्ह गेला असताना हा हल्ला झाला.सिनालोआ येथील एका सुरक्षा अधिकाऱ्याने या बातमीला दुजोरा देत सांगितले की, गोळीबारानंतर गॅस्टेलमचा मृत्यू झाला.

या गोळीबाराच्या घटनेने प्रेक्षकांना धक्का बसला आहे. कारण गॅस्टेलम सोशल मीडियावर 'लाइव्ह' असतानाच ही घटना घडली. त्याच्या फॉलोअर्सना लाइव्ह-स्ट्रीमद्वारे या घटनेचा काही भाग पाहता आला. हल्ल्याचे कारणही अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT