Shruti Vilas Kadam
आता केवळ गुगलवरूनच नाही तर WhatsApp आणि Instagram वरून देखील लोकेशन शेअर करता येतं.
लोकेशन शेअर करताना अनेक ऑप्शन येतात. त्यातील करंट लोकेशन या पर्यायावर क्लिक केल्याने, आपण ज्या ठिकाणी आहोत ते लोकेशन शेअर करता येते.
या पर्यायाच्या मदतीने तुम्ही रिअल टाईम लोकेशन शेअर करू शकता आणि तुमचा मित्र कुठे कुठे जातोय यावर लक्ष देखील ठेवता येईल.
लोकेशन शेअरिंगमध्ये सर्व काही यूजर्सच्या हाती असते, हवे तेव्हा चालू आणि बंद करता येते. त्यामुळे यूजर्स प्रायव्हसी सेफ राहते.
Instagram वापरणाऱ्या यूजर्ससाठी चॅटिंगमध्येच लोकेशनचा पर्याय उपलब्ध असतो. त्यावरून लोकेशन शेअर करता येते.
यातही दोन पर्याय उपलब्ध असून, पिन लोकेशन या पर्यायामुळे आहोत त्या ठिकाणाचे लोकशन शेअर करता येते.
WhatsApp प्रमाणेच Instagram लाईव्ह लोकेशन शेअरिंग करता येते आणि समोरचा माणूस मॅपच्या आधारे आपल्याला शोधू शकतो.