Sakshi Sunil Jadhav
गेल्या तीन दिवसांपासून लोणावळा-खंडाळा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर हिरवागार झाला असून पर्यटनाला वेग आलेला आहे.
सततच्या पावसामुळे अवघ्या ४८ तासांमध्ये २२९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अनेक धबधबे आणि ओढे तुडुंब भरून वाहत आहेत.
डोंगररांगा, घाटमाथा आणि शहराचा मोठा भाग दाट धुक्याने झाकलेला आहे. थंडगार वारा आणि निसर्गाचं मनमोहक दृश्य पर्यटकांना आकर्षित करत आहे.
सर्वाचं आवडतं ठिकाण म्हणजे भुशी धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे. सांडव्यावरून वाहणारे फेसाळ पाणी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक जात आहेत.
सहारा ब्रिज परिसरात काही पर्यटक उंच डोंगरांवर चढून सेल्फी आणि रील्स बनवत आहेत. निसरड्या दगडांमुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
लोणावळा नगर परिषद आणि पोलिसांकडून सुरक्षित पर्यटनाचे आवाहन करण्यात येत आहे. धोकादायक ठिकाणी जाणं टाळण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
दाट धुकं आणि सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. घाटमाथ्यावर वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवून सावधगिरी बाळगणं खूप गरजेचे आहे.
सध्या विकेंड सुरू झाला नाही, तरी सुद्धा लोणावळ्यात पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रमुख पर्यटन स्थळांवर आणि रस्त्यांवर गर्दी दिसून आलेली आहे.
पर्यटकांची वाढती संख्या आणि पावसाळी पर्यटनामुळे लोणावळ्यात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. पिकनिकचा प्लॅन करत असाल तर सुरक्षिततेची तयारी ठेवणे गरजेचे आहे.