MC Stan In Google Trend
MC Stan In Google Trend Saam Tv
मनोरंजन बातम्या

MC Stan नंबर वन...! ए.आर. रेहमानला मागे टाकत केली 'ही' मोठी गोष्ट

Chetan Bodke

MC Stan In Google Trend: 'बिग बॉस १६' चा विजेता MC स्टॅनची गेल्या अनेक दिवसांपासून बरीच चर्चा सुरु आहे. 'बिग बॉस १६' मुळे MC स्टॅनची चांगलीच चर्चा होत आहे. त्याने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम लाईव्हवर शाहरुख खानचा रेकॉर्ड मोडला होता. आता एमसी स्टॅनने नवा विक्रम केला आहे. यावेळी त्याने ए.आर. रेहमान, नेहा कक्कर ते अर्जित सिंग यांना मागे टाकत अव्वल स्थान मिळवले आहे. या सर्वांना मागे टाकत तो लोकप्रिय गायक ठरला.

गुगल ट्रेंड्सच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठा संगीतकार म्हणून सांगण्यात आले आहे. सध्या MC स्टॅनची तुलना सर्वात मोठ्या भारतीय चित्रपट संगीतकार, गायक आणि संगीतकारांशी केली जात आहे. या ट्रेंडमध्ये स्टॅनच्या चाहत्यांमधील त्यांची क्रेझ कायम आहे. त्याची सध्या अनेक दिग्गज गायकांसोबत तुलना केली जात आहे.

Google Trends वर मिळालेल्या माहितीनुसार, गुगलने नुकताच लोकप्रिय संगीतकारांची नावं जाहीर केली आहे. गुगल ट्रेंडमध्ये MC Stan, Neha Kakkar, Arijit Singh आणि AR रहमान हे गायक सध्या आहेत. MC स्टॅनची महाराष्ट्रात बरीच लोकप्रियता आहे. त्याला सर्वाधिक सर्च केलेले दिसून येत आहे. महाराष्ट्र, दमण, गोव्यापासून सर्वत्रच स्टॅनची हवा आहे.

स्टॅन लवकरच 'द कपिल शर्मा शो'मध्येही दिसणार आहे. सेटवरील त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो कपिल शर्मा शोमध्ये (MC Stan in Kapil Sharma Show) लाल सूटबूटमध्ये रॅप करताना दिसत आहे. खुद्द कपिललाही त्याने आपल्या रॅपवर थिरकवले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी थोड्याच वेळात मतदान

Heavy Rain Alert : मान्सून अंदमानात दाखल होताच वातावरण बदललं; या भागात तुफान पाऊस कोसळणार

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, २० मे २०२४ : मेषसह ४ राशींना मिळणार नशीबाची उत्तम साथ, तुमची रास कोणती?

Horoscope Today: तुमच्यासाठी सोमवार सुखाचा ठरेल की दुखाचा? वाचा राशिभविष्य

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

SCROLL FOR NEXT