मनोरंजन बातम्या

मार्टिन गॅरिक्सचा दमदार कॉन्सर्ट; ३०० ड्रोन, ४५ हजार पेक्षा जास्त प्रेक्षक, अन् अरजीत सिंगचं सरप्राइज

अरजीत सिंग आणि डीजे मार्टिन गॅरिक्स गायकाच्या घरी रिहर्सल करत असताना चर्चेत आले. मुंबईतील शोमध्ये ४५ हजारांहून अधिक प्रेक्षक होते, आणि ३०० ड्रोनचे प्रदर्शन पाहून चाहते मंत्रमुग्ध झाले.

Dhanshri Shintre

१४ मार्च रोजी नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियममध्ये जागतिक ईडीएम स्टार मार्टिन गॅरिक्सने थरारक लाईव्ह परफॉर्मन्स दिला. या कार्यक्रमात ४५ हजार प्रेक्षक उपस्थित होते. यावेळी अरजीत सिंगसोबत स्टेजवर होळी खेळली गेली, ज्यामुळे जगातील सर्वात मोठ्या होळी उत्सवाचा एक नवा विक्रम नोंदवला गेला.

या सोहळ्यामुळे उपस्थित चाहत्यांना धमाकेदार अनुभव मिळाला आणि ते रोमांचित झाले. या कार्यक्रमात हवाई ड्रोन, आतिषबाजी आणि रोमांचक सादरीकरणांचा समावेश होता, तसेच अद्भुत एलईडी आणि लेझर शोचा अनुभव प्रेक्षकांना पाहायला मिळाला. गायक अरजीत सिंगने आपल्या सादरीकरणाने कार्यक्रमाची शोभा वाढवली, ज्यामुळे वातावरण आणखी चैतन्यपूर्ण बनले.

त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. मार्टिन गॅरिक्स आणि अरिजीत सिंग यांनी एकत्र परफॉर्म केल्याने चाहते आनंदाने उड्या मारू लागले आणि कार्यक्रमाचा जलवा वाढवला. मार्टिन गॅरिक्सने 'कसं काय, मुंबई?' वाक्यापासून आपल्या सेटची सुरूवात केली. त्यानंतर त्याने 'एनिमल्स', 'हाय ऑन लाइफ' आणि 'इन द नेम ऑफ लव्ह' गाणी सादर केली. अरजीत सिंगने 'एंजल्स फॉर इच अदर' गाण्यात सामील होऊन सरप्राइज दिला.

रात्रीची सांगता आतिषबाजी, ड्रोन अ‍ॅक्रोबॅटिक्स आणि मार्टिन गॅरिक्सने मुंबईला भावनिक संदेश अर्पण करून केली. सोशल मीडियावर त्याने पोस्ट केली, "नेहमी माझ्या हृदयात... धन्यवाद, मुंबई!" मार्टिन गॅरिक्सला यापूर्वी अरिजीत सिंगच्या घरात पाहिलं गेलं, जिथे त्याचे फोटो व्हायरल झाले. अरजीतच्या घरातील साधेपणामुळे चाहते भावनिक झाले आणि त्यांना खूप भावनात्मक अनुभव आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Shivaji: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार संजू-सलमानची जोडी; साकारणार 'ही' खास भूमिका

Maharashtra Live News Update: सांगलीतील शेतकऱ्याने दोन एकर द्राक्ष बाग काढून टाकली

Pune Land Scam: १८०० कोटींच्या जमीन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई, ३ जणांविरोधात गुन्हा

Shocking News : धक्कदायक! वर्क लोड आला म्हणून नर्सने केली १० रुग्णांची हत्या, नेमकं काय प्रकरण?

Farsan Bhaji Recipe: रोज रोज बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग झणझणीत फरसाणची रस्सा भाजी खाऊन पाहाच

SCROLL FOR NEXT