Mardaani 3 Movie Saam tv
मनोरंजन बातम्या

Mardaani 3 : हरवलेल्या मुली, भयावह कट आणि शिवानी रॉय; सस्पेन्सने भरलेला ‘मर्दानी 3’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Mardaani 3 Movie: यश राज फिल्म्सचा राणी मुखर्जी अभिनीत ‘मर्दानी 3’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात शिवानी रॉय बेपत्ता मुलींना वाचवण्यासाठी येणार आहे.

Shruti Vilas Kadam

Mardaani 3 Movie: यश राज फिल्म्सने बहुप्रतीक्षित आणि चर्चेत असलेल्या राणी मुखर्जी अभिनीत ‘मर्दानी 3’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित केला असून, यानिमित्ताने भारताच्या सिनेमाची आयकॉन असलेली राणी मुखर्जीच्या 30 वर्षांच्या चित्रपट कारकिर्द सरु ठेवत पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘मर्दानी’ ही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय स्त्रीवादी फ्रँचायझी आहे. तिचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याआधी या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

‘मर्दानी’ फ्रँचायझीने गेल्या दशकभरात प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम आणि समीक्षकांची प्रशंसा मिळवली आहे. महिला पोलीस अधिकारी केंद्रस्थानी असलेली ही भारतातील एकमेव यशस्वी सिनेमा फ्रँचायझी असून, सिनेप्रेमींमध्ये या चित्रपटाने कल्ट स्टेटस मिळवला आहे. या तिसऱ्या भागातही राणी मुखर्जी पुन्हा एकदा निर्भय, ठाम आणि कणखर पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत दिसणार आहेत.

मर्दानी 3’मध्ये शिवानी देशभरातील बेपत्ता झालेल्या मुलींना वाचवण्यासाठी संघर्ष करताना दिसणार आहे. यावेळी तिच्यासमोर उभी राहणार आहे एक अत्यंत निर्दयी, शक्तिशाली आणि दुष्ट खलनायिका. निष्पाप जीवांसाठीची ही लढाई अधिक हिंसक, क्रूर आणि थरारक स्वरूपाची असल्याचे ट्रेलरमधून स्पष्ट होते. या खलनायिकेची भूमिका साकारत आहेत अभिनेत्री मल्लिका प्रसाद. तर ‘शैतान’ चित्रपटातून ओळख निर्माण करणारी अभिनेत्री जानकी बोडीवाला देखील या फ्रँचायझीमध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

अभिराज मिनावाला दिग्दर्शित आणि आदित्य चोप्रा निर्मित ‘मर्दानी 3’ हा चित्रपट सामाजिक विषयांवर आधारित आहे. पहिल्या भागात मानव तस्करी, तर दुसऱ्या भागात सिरीयल रेपिस्टच्या विकृत मानसिकतेवर प्रकाश टाकण्यात आला होता. ‘मर्दानी 3’ समाजातील आणखी एका क्रूर वास्तवावर आधारित आहे. हा बहुप्रतीक्षित चित्रपट 30 जानेवारी 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : तुमचा जवळचा मित्र विश्वासघात करण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना जपून निर्णय घ्यावा लागेल

दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटीक्स; शिंदेंचा ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल|VIDEO

CM फडणवीसांकडून 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्न; शिवतीर्थावरून ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल, VIDEO

मलाईवरुन मुंबई तापली, मुंबईत येतो, पाय छाटून दाखवा

ऐन निवडणुकीत महायुती सरकारला मोठा धक्का; लाडकी बहीण योजनेचे पैसे रखडले, कारण काय?

SCROLL FOR NEXT