Aai Kuthe Kay Karte Serial Latest Update Saam TV
मनोरंजन बातम्या

Aai Kuthe Kay Karte: टीआरपीमध्ये अव्वल ठरलेल्या मालिकेत येणार प्रेमाचा नवा ट्वीस्ट; ‘ते’ तीन शब्द ऐकून आशुतोष झाला लाजून चुर

प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या एका वेगळ्याच वळणावर गेलेली दिसते.

Chetan Bodke

Aai Kuthe Kay Karte Serial Latest Update: नेहमीच टीआरपीमध्ये अव्वल ठरलेल्या ‘आई कुठे काय करते’ ही मालिका नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मालिका सध्या एका वेगळ्याच वळणावर गेलेली दिसते. सध्या या मालिकेत इशाच्या साखरपुड्याची चर्चा होत आहे. तर एका बाजुला संजना आणि अनिरूद्धमध्ये काही शाब्दिक बाचाबाची झालेली आपल्या दिसून येत आहे.

अनिरूद्धने त्याची दुसरी पत्नी संजनाच्या ऑफिसमध्ये जाऊन वाद घातला. तो इतका वाद इतका टोकाला गेला की, त्यात अनिरूद्धने त्याच्या पत्नीच्या सहनशक्तीचा अंतच पार केला. सध्या इशाच्या साखरपुड्याची लगबग आपल्याला दिसून येत आहे.

संजना आणि अनिरूद्धमध्ये झालेल्या शाब्दिक वादात संजना अनिरूद्धला कधीच माफ करणार नाही. इतका घातलेल्या तमाशानंतर आशुतोष संजनाची माफी आपल्या स्वार्थापोटी घेतो. आपण जे केलं ते योग्यच केलं, फक्त आपली पद्धत चुकली असं त्याचं मत आहे. आता त्याच्या स्वार्थी बोलण्याला संजना भुलणार नसल्याचं सांगणार आहे. या गोड बोलण्याला आपण भुलणार नसल्याचं संजना सांगणार आहे. (Marathi Film)

लवकरच इशा आणि अनिशच्या साखरपुड्याच्या तारखा काढण्यासाठी आप्पा आणि कांचनताई केळकरांच्या घरी जाणार आहेत. यावेळी त्यांच्या पत्रिका पाहण्याचा हट्ट कांचन करणार आहेत. जरी ही त्यांच्या पत्रिका जुळत नसल्यातरी, त्यांचं लग्न नक्की होणार, यावर कांचन ठाम आहेत. त्यामुळे त्यांच्या पत्रिका पाहून काहीच फायदा नसून त्यांनी आपलं लग्न टिकवायला हवं. असं सुलेखा ताईचं मत आहे. (Entertainment News)

लवकरच मालिकेत साखरपुडा पाहायला मिळणार असून एका बाजूला अरूंधती आशुतोषवर असणाऱ्या प्रेमाची कबुली देताना दिसणार आहे. सध्या या मालिकेत प्रेमाचे वारे वाहत आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता आशुतोषवर असणाऱ्या प्रेमाची कबुली अरूंधती मान खाली घालून तरी का होईना उत्तर देणार असल्याने आशुतोषचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ते तीन शब्द ऐकून आशुतोषच्या चेहेऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे. (Marathi Actors)

आता आशुतोष आणि अरूंधतीमधील दुरावा आता संपत असून त्यांच्या प्रेमाची ही बरीच चर्चा होते. दोघेही एकमेकांची काळजी अगदी चांगल्या पद्धतीने घेत असून अरूंधती आशुतोषसोबत सुखी असल्याचं दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon : मासे पकडणे बेतले जीवावर; पाय घसरून तलावात पडल्याने तरुणाचा बुडून मृत्यू

Appendix: अपेडिंक्स कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती? वेळीच घ्या काळजी

Google Gemini चा वापर करून रेट्रो स्टाईल फोटो कसा बनवायचा?

ITR भरण्याची मुदत सरकारने एका दिवसाने वाढवली, पण ३१ डिसेंबरपर्यंतही भरु शकता इनकम टॅक्स रिटर्न्स

Meghalaya Politics : भाजपला सर्वात मोठा धक्का? अचानक सरकारमधील ६६ टक्के मंत्र्यांचे राजीनामे, मेघालयातील राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT