prajakta mali  intagram @prajakta_official
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali: प्राजक्ताचा आनंद गगनात मावेना, चाहत्यांसोबत शेअर केली 'गुड न्यूज'

प्राजक्ताला पुण्याच्या 'सावित्रीबाई फुले' विद्यापीठात “युवा पुरस्कार”ने गौरविण्यात आले आहे.

Chetan Bodke

Prajakta Mali Viral Post: मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या बिझनेस वुमन म्हणून चर्चेत आहे. कधी प्राजक्ता सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे तर कधी काही भन्नाट पोस्टमुळे चर्चेत असते. यंदा तिच्या चर्चेत येण्याचे कारण फार वेगळं आहे. तिला नुकताच पुण्याच्या 'सावित्रीबाई फुले विद्यापीठ'मधून एका पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

प्राजक्ता माळी मुळची पुणेरी. तिचं सर्व शिक्षण पुण्यातलंच. ज्या विद्यापीठात प्राजक्ता माळी शिकली त्याच विद्यापीठातून तिला “युवा पुरस्कार” प्राप्त झाला आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांनाही गुड न्यूज दिली आहे.

पोस्ट शेअर करत प्राजक्त माळी म्हणते, "परवा ‘सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाचा’; “युवा पुरस्कार” मिळाला… पुणे शहरात वाढले, सगळं शिक्षण पुण्यात झालं, पुणे विद्यापीठातून पदवीधर झाले… त्यामुळे घरातून शाबासकी मिळाल्याची भावना आहे… ह्यात “ललित कला केंद्र गुरुकुल- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ”, माझे नृत्य गुरूद्वय- गुरू श्रीमती स्वातीताई दातार, गुरू श्री. परिमल फडके, माझं कुटूंब, माझी प्राथमिक शाळा- समर्थ विद्यालय, माध्यमिक शाळा- दामले प्रशाला- महाराष्ट्र मंडळ, पुणे शहर, प्राजक्तप्रभा, प्राजक्तराज, आतापर्यंत केलेल्या सगळ्या मालिका, चित्रपट, विशेषकरून महाराष्ट्राची हास्यजत्रा, Art of living foundation- श्री श्री रवीशंकरजी आणि “माझा अत्यंत प्रामाणिक असा प्रेक्षकवर्ग” ह्या सगळ्यांचा सहभाग आहे. विद्यापीठाचे, ललित कला केंद्राचे प्रवीण भोळे सर व परिमल सर ह्यांचे विशेष आभार… सरतेशेवटी.., माझ्याकडून तुमचं जास्तीत जास्त मनोरंजन होवो, तुमची सेवा घडो; हीच ईश्वराचरणी प्रार्थना."

यावेळी प्राजक्ताच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी तोंडभरुन कौतुक केले आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Nachnichi Bhakri Recipe : गावाकडे बनवतात तशी मऊ-लुसलुशीत नाचणीची भाकरी, वाचा परफेक्ट रेसिपी

Marathi Serial Off Air : "...One Last Time"; लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्रीनं केली खास पोस्ट

iPhone युजर्ससाठी धक्का! Truecaller मधील कॉल रेकॉर्डिंग फीचर होणार बंद, बॅकअपसाठी 'असा' उपाय करा

Tulja Bhavani Temple : तुळजाभवानीची गायब तलवार सापडली; महिनाभरापासून गायब होती तलवार, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT