Actress Ujwala Jog Jamal Kudu Viral Dance Video Instagram
मनोरंजन बातम्या

Ujwala Jog Jamal Kudu Dance: मराठमोळ्या अभिनेत्रीचा ‘जमाल कुडू’ गाण्यावर भन्नाट डान्स; नऊवारीत थिरकताना पाहून चाहतेही थक्क

Ujwala Jog Viral Dance Video: मराठमोळ्या ज्येष्ठ अभिनेत्री उज्वला जोग यांनीही ‘जमाल कुडू’ गाण्यावर जबरदस्त डान्स करत व्हिडीओ शेअर केला आहे.

Chetan Bodke

Actress Ujwala Jog Jamal Kudu Viral Dance Video

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्नाचा १ डिसेंबरला ‘ॲनिमल’ चित्रपट रिलीज झाला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एका महिन्यात अफलातून कमाई करत प्रेक्षकांचे मन जिंकले. कलाकारांचा अभिनय आणि चित्रपटातल्या गाण्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले. ‘जमाल कुडू’ गाण्याचे सोशल मीडियावर खूप फॅन्स आहेत. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी गाण्यावर व्हिडीओ बनवले आहेत. नुकतंच मराठमोळ्या ज्येष्ठ अभिनेत्री उज्वला जोग यांनीही या गाण्यावर जबरदस्त डान्स करत नेटकऱ्यांचे मन जिंकले.

विशेष म्हणजे, त्यांच्या या वयातील एनर्जीने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. त्यांनी हा व्हिडीओ बनवताना नऊवारी परिधान केली होती. व्हाईट कलरची काठापदराची साडी, नाकात नथ आणि लूकला साजेसे दागिने परिधान करत उज्वला यांनी बॉलिवूड गाण्यावर ठेका धरला. उज्वला जोग यांनी हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना ‘आत्या अरबार स्टाईल’ अशा आशयाची कॅप्शन देत व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

४५ हजारांहून अधिक या रिलला व्ह्यूज मिळाले असून हजारो लाईक्स मिळाले आहेत. खरंतर, ‘झिम्मा २’ कथाही ज्येष्ठ अभिनेत्री उज्वला जोग यांच्यावर आधारित आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या त्या सासू असून क्षिती जोगच्या त्या आई आहेत. चित्रपटाच्या कथेबद्दलची माहिती दिग्दर्शक हेमंत ढोमेने एका इंटरव्ह्यूमध्ये दिली होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाने आतापर्यंत १०. ६२ कोटींची कमाई केली आहे. उज्वला जोग यांच्याबद्दल बोलायचे तर, त्या एक मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्यातील ७५ हजार युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार - लोढा

Farmer : आठ महिन्यात ११८३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; पश्चिम विदर्भात सर्वात मोठा आकडा आला समोर

Satara Gadget: पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी खुशखबर, हैदराबादनंतर सातारा गॅझेट्ससाठी हालचालींना वेग

Thar Car Accident: महिलेने नवी कोरी थार घेतली, लिंबूवरून नेली अन् घडलं भयंकर, VIDEO होतोय व्हायरल

'Bigg Boss 19'च्या तिसऱ्या आठवड्यात होणार डबल एलिमिनेशन? 4 सदस्य झाले नॉमिनेट

SCROLL FOR NEXT