Tejashri Pradhan Birthday : अभिनयात तरबेज असलेली तेजश्री प्रधान अभ्यासतही हुशार, व्हायचं होतं काऊन्सिलर पण...
Tejashri Pradhan Instagram @tejashripradhan
मनोरंजन बातम्या

Tejashri Pradhan Birthday : अभिनयात तरबेज असलेली तेजश्री प्रधान अभ्यासतही हुशार, व्हायचं होतं काऊन्सिलर पण...

Chetan Bodke

'प्रेमाची गोष्ट' आणि 'होणार सुन मी ह्या घरची' मालिकेमध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने विशेष प्रसिद्धी मिळवली आहे. आज तेजश्री प्रधानचा वाढदिवस आहे. आज अभिनेत्री ३६ वा वाढदिवस सेलिब्रेट करणार असून २ जून १९८८ रोजी तिचा डोंबिवलीमध्ये जन्म झालेला आहे.

तिने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. अभिनयात माहीर असलेली तेजश्री अभ्यासातही प्रचंड हुशार आहे. तेजश्रीचं संपूर्ण बालपण डोंबिवलीमध्ये गेले आहे. तिला काऊन्सिलर बनायचं होतं त्यामुळे ती सायकॉलॉजीचं शिक्षण घेत होती. तिला मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतर तिने शिक्षण अर्ध्यावर सोडलं. त्यानंतर आपलं नशीब अभिनयक्षेत्रातच पूर्ण करण्याचं तिने ठरवलं. तेजश्री फक्त मराठी भाषेतच नाही तर, हिंदी, इंग्लिश आणि जर्मन भाषेतही माहिर आहे.

तेजश्रीच्या कामाबद्दल बोलायचं ठरले तर, 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'तुझं नी माझं घर श्रीमंताचं, 'लेक लाडकी या घरची' सह अशा अनेक लोकप्रिय टेलिव्हिजन सिरीयलमध्ये तिने प्रमुख भूमिका साकारली होती. त्यासोबतच, 'झेंडा', 'डॉ. प्रकाश बाबा आमटे', 'शर्यत' अशा अनेक वेगवेगळ्या चित्रपटांतही तिने प्रमुख भूमिका साकारली आहे. त्यासोबतच तेजश्रीने प्रशांत दामले यांच्या 'कार्टी काळजात घुसली' आणि 'मैं और तू' या नाटकांमध्येही काम केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hero ने लॉन्च केली नवीन कार्बन फायबर बाईक, फक्त 'हेच' लोक खरेदी करू शकतील

Nikita Dutta: जरतारी काठ, नऊवारी थाट! निकिता दत्ताचा मराठमोळा लूक

Old Pension Video: कर्मचारी 10 अन् सरकार भरणार 14 टक्के! जुन्या पेन्शनला सरकारचा नवा पर्याय

T20 World Cup: टी -२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार पटकावणारे खेळाडू

Crocodile Video: चिपळुणमध्ये महाकाय मगरीचा रस्त्यावर मुक्तसंचार, नागरिकांची भीतीनं गाळण

SCROLL FOR NEXT