Posts Of Marathi Celebrities About World Earth Day Instagram
मनोरंजन बातम्या

Posts Of Marathi Celebrities About World Earth Day: वसुंधरा दिनी आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीचे आवाहन; प्रदुषण रोखण्याचे सांगितले १०१ रामबाण उपाय

वसुंधरा दिनाचे निमित्त साधत प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी महांगडेने चाहत्यांना एक अनोखं आवाहन केलंय.

Chetan Bodke

Posts Of Marathi Celebrities About World Earth Day: वसुंधरा दिनी आपण अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला. काहींनी या दिवसाचे औचित्य साधत महत्वपूर्ण निर्णय देखील घेतले. काही मराठी सेलिब्रिटींनी देखील या दिवसाचे सेलिब्रेशन देखील केले. प्रत्येकाला पृथ्वीविषयीची कृतज्ञता आणि तिचे संवर्धन सोबतच जाणीवजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे निमित्त साधत प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी महांगडेने एक पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना एक अनोखं आवाहन केलंय.

आश्विनी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. २२ एप्रिलला तिने एक पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दोन फोटोज् शेअर करत आश्विनीने चाहत्यांसोबत निसर्गाबद्दल एक खास पोस्ट शेअर केली. ‘जुन्या कपडयांच्या कचऱ्यापासून वाचूया’, असे आवाहन करत तिने ही पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली. (Marathi Film)

यावेळी आश्विनीने पांढरा रंगाचा लाँग टॉप घातला असून जीन्स आणि पांढरा रंगाचे शूज घालत पर्यावरण स्नेही बॅगेसोबत तिने फोटो शेअर केले आहेत. अगदी साधी सिंपल असलेली ही बॅग सगळ्यांचंच लक्ष वेधते. आश्विनी पोस्ट करत म्हणते, “ही साधी बॅग नसून ही एक बॅग ३.६ kg कार्बन उसर्जन कमी करते, ते कसे ते जाणून घेऊया ???” (Marathi Actress)

त्या बॅगेचे महत्व सांगत आश्विनी म्हणते, “आपण दरवर्षी नवीन कपडे खरेदी करतो. पण जुन्या कपड्यांचे काय करायचे हा प्रश्न पडतो. ह्याला उपाय म्हणून Eco_Regain काम करते. Eco_Regain जुने कपडे upcycle & Recycle करते आणि त्यातून हे प्रॉडक्ट्स बनवते. Eco_Regain च्या वूमन एम्पॉवरमेंट सेन्टर च्या महिला ह्या प्रॉडक्ट्स बनवतात. आज जागतिक वसुंधरा दिवस आहे. आणि हे जुने कपडे सुद्धा पर्यावरणास तितकेच घातक आहेत. आता हे कपडे कुठे फेकून न देता Eco_Regain ला द्या आणि त्याचे Upcycle & Recycle प्रॉडक्ट्स वापरा..जुन्या कपडयांच्या कचऱ्या पासून वाचूया.!” अशी पोस्ट तिने चाहत्यांसोबत शेअर केली. (Latest Marathi News)

आश्विनी महांगडे मराठी सिनेसृष्टीतील नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री असून ती सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते. स्टार प्रवाह मराठीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत आश्विनी अनघा नावाचे पात्र साकारते. सोबतच आतापर्यंत आश्विनीने अनेक कलाकृतींमध्ये ऐतिहासिक पात्र साकारले. मुख्य बाब म्हणजे, ‘महाराष्ट्र शाहीर’ या बहुप्रतिक्षित चित्रपटातही आश्विनी झळकणार असून ती चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bomb Blast: 11 आरोपी निर्दोष,मग बॉम्बस्फोट कुणी केले?

Political Clash: छावा विरुद्ध राष्ट्रवादी, महाराष्ट्रात वाद पेटला

Pune Crime : मुलाने प्रॉपर्टीसाठी छळ करायची सीमा गाठली; आईला वृद्धाश्रमात धाडलं, बहिणीला मनोरुग्णालयात, पुण्यातील प्रकार

Manikrao Kokate: रमी खेळणं कृषीमंत्र्यांना भोवणार? वाचाळवीर कोकाटेंचं मंत्रिपद जाणार?

Jagdeep Dhankhad Resign : मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, कारणही समोर

SCROLL FOR NEXT