Milind Gawali Shared Mothers Day Special Post Instagram
मनोरंजन बातम्या

Milind Gawali : "आजारी होती, खूप शारीरिक वेदना व्हायच्या पण..."; मिलिंद गवळी यांची ‘Mothers Day’ निमित्त भावूक व्हिडीओ व्हायरल

Milind Gawali Shared Mothers Day Special Post : 'मदर्स डे'चे औचित्य साधत अभिनेत्याने एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेता भावूक झालेला आहे.

Chetan Bodke

आज मातृदिनानिमित्त (Mothers Day) सोशल मीडियावर युजर्स आपल्या आईसोबत फोटो शेअर करत 'मदर्स डे'च्या शुभेच्छा देत आहेत. यामध्ये अनेक सेलिब्रिटीही आपल्या आईसोबत फोटो शेअर करताना पाहायला मिळत आहे. नुकतंच 'आई कुठे काय करते' फेम अभिनेता मिलिंद गवळी यांनी 'मदर्स डे'निमित्त एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. 'मदर्स डे'चे औचित्य साधत अभिनेत्याने एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेता भावूक झालेला आहे.

व्हिडीओमध्ये अभिनेता आईच्या आठवणीत व्याकूळ झालेला दिसत आहे. हा भावूक व्हिडीओ शेअर करताना अभिनेता आपल्या पोस्टमध्ये लिहितो, "मातृदिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा... खरंतर मातृदिन हा एक दिवस असू शकत नाही. वर्षातले ३६५ दिवस मातृदिनच असायला हवा, खरंच आपण आईला किती गृहीत धरत असतो. आपल्याला नऊ महिने पोटात सांभाळून, असंख्य वेदना सहन करून, आपल्याला जन्म देते आणि आपल्याला जन्म दिल्यानंतर आयुष्यभर निस्वार्थीपणे आपला सांभाळ करते, आपली काळजी घेते, हवं नको ते सगळं बघते, आपल्याला बोलायला,चालायला, धावायला शिकवते, पहिली प्रायोरिटी तिच्यासाठी आपण असतो, ती स्वतःची कधी काळजी घेतच नाही, सतत आपली काळजी करत राहते."

"माझी आई तर मी बाहेरून आल्या आल्या माझा चेहरा बघून ती सांगू शकायची आजचा माझा दिवस कसा गेला असेल ते, आणि मला नेहमीच आश्चर्य वाटायचं, की तिला कसं कळतं, एक दिवस मी घरी आलो आणि माझ्या चेहऱ्यावरन तिने ओळखलं की काहीतरी गडबड झाली आहे, ती मला सारखं विचारे “काय झालं बाळा काहीतरी झालं आहे, तू माझ्यापासून लपवतोयस आणि खरंच मी तिच्यापासून लपवत होतो की त्या दिवशी मी ज्या रिक्षात न जात होतो ती रिक्षा पलटली होती आणि माझ्या पायाला लागलं होतं, आईचा मुलांमध्ये जीव अडकलेला असतो ते काय खोटं नाही आहे. माझी आई तर माझी काळजी करत करतच गेली, स्वतःची काळजी तिने कधी घेतलीच नाही. तिने तिचा आनंद जगाबरोबर साजरा केला पण तिचं दुःख मात्र तिने तिच्याजवळच कायम ठेवलं, आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीची तक्रार तिने कधी केली नाही, तिने तिचं जगणं नेहमी सेलिब्रेटंच केलं."

"माझी आई असेपर्यंत मी राजासारखाच जगलो, तिने मला प्रामाणिकपणे कष्ट करायला शिकवलं. ती स्वतः खूप मोठी मोठी स्वप्न पाहायची. तिने मलाही मोठी स्वप्न बघायला शिकवलं. आपल्याकडे कष्ट करायची जिद्द असेल आणि परमेश्वरावर श्रद्धा असेल तर जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही असं असं ती नेहमी सांगत असे. तिला राग द्वेष हे काय माहिती नव्हतं तिला फक्त असीम प्रेम करणं निस्वार्थ प्रेम करणं हेच ठाऊक होतं, आणि आणि प्रेम करण्यामध्ये कधी भेदभाव नव्हता, गरीब श्रीमंतीचा भेदभाव नव्हता लहान-मोठ्याचा भेद भाव नव्हता."

"गणेशपुरीच्या नित्यानंद बाबांवर मुक्तानंद बाबांवर आणि गुरुमांईवर अपार श्रद्धा होती. शेवटच्या क्षणापर्यंत ती त्यांचा जप करत होती, आजारी होती खूप शारीरिक वेदना व्हायच्या पण म्हणायची मला कसली भीतीच नाहीये मला मोक्षच मिळणार. मला अजूनही असं वाटतं की ती शरीराने आपल्यात नाहीये पण मनाने ती सतत माझ्या जवळच असते. मातृदिनाच्या निमित्ताने एवढेच सांगावस वाटतं, आपल्या आईला जपा, तिला आनंदी ठेवा, खूप प्रेम करा तिच्यावर."

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT