Saleel Kulkarni Share Suhana Khan Dance Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Eka Makdane Kadhale Dukan Viral Video: ‘एका माकडाने काढले दुकान’ गाण्यावर सुहाना खानचा भन्नाट डान्स; व्हिडीओ पाहून सलील कुलकर्णी म्हणतात, “आता फक्त हसायचं...”

Eka Makdane Kadhale Dukan Song Viral Video: प्रसिद्ध गायक आणि गीतकार सलील कुलकर्णी यांनी ‘एका माकडाने काढले दुकान’ या गाण्याचा एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे.

Chetan Bodke

Saleel Kulkarni Share Suhana Khan Dance Video

२०२३ मध्ये किंग खानची लेक सुहाना खानने 'द आर्चीज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. तिचा पहिला चित्रपट 'नेटफ्लिक्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. सध्या या चित्रपटातील काही सीन्स सोशल मीडियावर बरेच चर्चेत आले आहे. प्रसिद्ध गायक आणि गीतकार सलील कुलकर्णी यांनी ‘एका माकडाने काढले दुकान’ या गाण्याचा एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे.

सलील कुलकर्णी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये 'द आर्चीज' मधील एका गाण्यातील काही सीन्स दिसत आहे. त्या गाण्यातील सीन्स आणि बॅकग्राऊंडला ‘एका माकडाने काढले दुकान’ हे गाणं लावून भन्नाट एडिट केलं आहे. सलील कुलकर्णी यांनी हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये सलील कुलकर्णी म्हणतात, " "एका माकडाने काढले दुकान... आली गिऱ्हाईके छान छान " विंदांच्या या कवितेचं मी १९९९ मध्ये गाणं केलं होतं... आत्ताची धृपद गायिका मेघना सरदार तेव्हा १०-११ वर्षांची होती, तिने ते गाणं गायलं होतं... लहान मुलांच्या अनेक पिढ्यांनी हे मनापासून ऐकलं... दाद दिली... नंतर अनेक YouTube channel ने ह्याचे उथळ हिंदी भाषांतर करून माझ्याच चालीत रिलीज केलं..."

"मी अर्थातच "निषेध सुद्धा नोंदवलेला नाही" मग हळूहळू मराठीतल्या पण अनेक YouTube चॅनलने विंदा किंवा माझा उल्लेख न करता ते वाजवले, त्याचा व्हिडिओ केला. मी पुन्हा एकदा "जगभरातील मुलांनी ऐकलं... त्यांना आवडलं हे खूप आहे." असा समजूतदार (खरंतर बावळट आणि आळशी ) धोरण स्वीकारलं... आता काही दिवसांपूर्वी हे गाणं ह्या धमाल editing सकट बघायला मिळालं... ते सुद्धा व्हायरल झालं... आता तर मी निषेध वगैरे ओलांडून हसण्याच्या स्टेजला आलो आहे..."

"विंदांच्या घरी बसून त्यांना हे गाणं ऐकवलं होतं... त्यांनी हा व्हिडिओ पाहिला असता तर "माझ्या मना बन दगड" नावाची त्यांची कविता ऐकावयाला त्यांना अजून एक कारण सापडले असते... तर... "एका माकडाने काढले दुकान" या गाण्याचा प्रवास गमतीशीर चालू आहे... आजची छोटी मुलं सुद्धा ते गाणं ऐकातायत... विंदा... आपल गाणं HIT आहे..."

सलील कुलकर्णी यांचीही पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. सलील कुलकर्णी यांना अनेक सेलिब्रिटी मित्रांनी या पोस्टवर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. काही वेळापूर्वीच ही पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली असून २ हजारहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी परतूर येथे काँग्रेसच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा

Madhura Joshi: गुलाबी साडी अन् ओठावर लाली, मधुराच्या सौंदर्याची भलतीच चर्चा

Nandurbar Crime : किरकोळ वादातून भररस्त्यात चाकू हल्ला; तरुणाचा मृत्यू, नंदुरबारमध्ये तणावाचे वातावरण

Shahrukh Khan: शाहरुख खानसाठी मुलगा आर्यन झाला फोटोग्राफर; 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'च्या स्क्रीनिंगचा VIDEO व्हायरल

High Court: मराठा आरक्षणाच्या GR विरोधात याचिका, न्यायाधीशांनी दिला मोठा निर्णय, कोर्टात नेमकं काय काय झालं?

SCROLL FOR NEXT