Rohit Raut Debut In Acting Instagram
मनोरंजन बातम्या

Rohit Raut Debut In Acting: रोहित राऊतचे अभिनयात पदार्पण, लवकरच दिसणार मालिकेत

Rohit Raut New Serial: लवकरच एका मालिकेच्या माध्यमातून रोहित राऊत अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Chetan Bodke

Rohit Raut In 36 Guni Jodi: मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या विरंगुळ्याचे मोठे स्थान आहे. अशा बऱ्याच मालिका आहेत, त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यातीलच एका कार्यक्रमाने प्रेक्षकांचे मन जिंकले. दहा ते बारा वर्षांपूर्वी ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ मधील पंचरत्नांनी सर्वांचेच निखळ मनोरंजन केले होते.

त्यांच्या सुमधुर आवाजाने अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले. आर्या आंबेकर, रोहित राऊत, प्रथमेश लघाटे, कार्तिकी गायकवाड आणि मुग्धा वैशंपायन हे पंचरत्न कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. सध्या रोहित राऊत सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे. पण तो यावेळी त्याच्या गाण्यामुळे नाही तर, एका मालिकेतील अभिनयामुळे तो चर्चेत आला.

‘सारेगमप लिटील चॅम्प्स’च्या माध्यमातून चर्चेत आलेले हे पंचरत्न अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असतात. पंचरत्नातील काही हिऱ्यांनी गाण्यासोबतच अभिनयातही आपलं नशीब आजमावले आहे. काही वर्षांपूर्वी आर्य आंबेकरने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं होतं. आता तिच्या मागोमागंच रोहित राऊत देखील अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याने अभिनेता म्हणून झी मराठीवरील ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. सध्या सोशल मीडियावर मालिकेचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘३६ गुणी जोडी’ या मालिकेमध्ये जोडीचे एकमेकांविरुद्ध व्यक्तिमत्व दाखवले. दोघांचेही दृष्टिकोन वेगवेगळे आहेत. वेदांत आणि अमूल्या या दोघांचीही लवस्टोरी सुरू झालेली नाही, परंतू आता सुरू होण्याआधीच मालिकेत एका तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झालीय. मालिकेत तिसरी व्यक्ती दुसरी- तिसरी कोणी नसून ‘सारेगमप लिटील चॅम्प्स’फेम रोहित राऊत पदार्पण करणार आहे.

रोहित राऊत ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याची शक्यता आहे. तो या मालिकेत पाहुणा कलाकार दिसणार की, मुख्य भूमिकेत दिसणार हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. आपल्या दमदार आवाजामुळे रोहितने फार कमी दिवसातच त्याने लोकप्रियता मिळवली होती. त्यामुळेच त्याच्या फॅन्सची संख्या देखील बरीच मोठी आहे. तो सोशल मीडियावर देखील कायम चर्चेत असतो. गेल्या वर्षीच रोहितने गायिका जुईली जोगळेकर सोबत लग्नगाठ बांधली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nirmala Nawale: कारेगावच्या सरपंचबाईंनी केली पहिल्या श्रावणी सोमवारची पूजा; PHOTO पाहा

Dharashiv : शेतात काम करताना अनर्थ घडला; तीन चिमुकल्या झाल्या पोरक्या, गावाने उचलली मुलींची जबाबदारी

Maharashtra Live News Update: उद्या दुपारी होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Rajgira Paratha Recipe : श्रावणात उपवासाला करा झटपट राजगिऱ्याचे पराठे, वाचा सोपी रेसिपी

Kolhapur : कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस; ५७ बंधारे पाण्याखाली | VIDEO

SCROLL FOR NEXT