Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Post Wedding Shoot Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mugdha Vaishampayan आणि Prathamesh Laghateचं पोस्ट व्हेडिंग शूट, क्युट VIDEO ची चर्चा

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Post Wedding Shoot: नुकताच मुग्धा आणि प्रथमेशच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाली. या निमित्ताने या कपलने पोस्ट व्हेडिंग व्हिडीओ शूट केले. समुद्र किनाऱ्यावर मराठमोळ्या लूकमध्ये या कपलने सुंदर व्हिडीओ शूट केले आहे.

Priya More

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate:

'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' (Sa Re Ga Ma Pa Li'l Champs) फेम मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) या कपलने मागच्या वर्षी लग्न केले. लग्न झाल्यापासून हे कपल सतत चर्चेत असते. दोघेही सोशल मीडियावर पोस्ट करत एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करताना दिसतात. नुकताच मुग्धा आणि प्रथमेशच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाली. या निमित्ताने या कपलने पोस्ट व्हेडिंग व्हिडीओ शूट केले. समुद्र किनाऱ्यावर मराठमोळ्या लूकमध्ये या कपलने सुंदर व्हिडीओ शूट केले आहे. त्यांच्या या क्युट व्हिडीओला चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.

मुग्धा आणि प्रथमेशने अतिशय साध्या पद्धतीने लग्न केले होते. हे कपल सध्या वैवाहिक आयुष्य एन्जॉय करताना दिसत आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण ते आपल्या चाहत्यांसोबत शेअर देखील करत आहेत. लग्नाला दोन महिनेपूर्ण झाल्याच्या निमित्ताने या कपलने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या कपलने पोस्ट व्हेडिंग व्हिडीओ शूट केले आहे. पारंपारिक लूकमध्ये त्यांनी हे पोस्ट व्हेडिंग शूट केले असून दोघेही खूपच क्यूट दिसत आहेत.

मुग्धा आणि प्रथमेश यांनी पोस्ट व्हेडिंग शूट समुद्र किनाऱ्यावर केले आहे. मुग्धाने अबोली रंगाची काठपदराची साडी नेसली आहे. तर प्रथमेशने मोती कलरची शेरवानी घातली आहे. अतिशय साध्यापणाने त्यांनी हा व्हिडीओ शूट केला आहे. या कपलचा साधेपणा त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो. दोघांचे एकमेकांवरील प्रेम हे या व्हिडीओमधून दिसून येत आहे. मुग्धा आणि प्रथमेशच्या या व्हिडीओला त्यांच्या चाहत्यांनी खूप चांगली पसंती दिली आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, '2 months already! Forever to go!'

दरम्यान, जून २०२३ मध्ये प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायनने 'आमचं ठरलंय' म्हणत प्रेमाची कबुली दिली होती. दोघांनीही प्रेमाची कबुली दिल्यानंतर २१ डिसेंबर २०२३ ला या कपलचे चिपळूणमध्ये अगदी साध्या पद्धतीने आणि मराठमोळ्या पारंपारिक पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'च्या मंचावर मुग्धा आणि प्रथमेशची ओळख झाली. त्यानंतर त्यांची मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर या दोघांनीही एकमेकांची आयुष्याची जोडीदार म्हणून निवड केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

पुण्यात गुन्हेगारांना तिकिट देणं आवडलं नाही, फडणवीसांनी अजित पवारांना सुनावले

Mahhi Vij : "तुम लोगों पर थूकती हूं..."; घटस्फोटानंतर माहीचे मित्रासोबत जोडलं नाव, संतापलेल्या अभिनेत्रीनं VIDEO केला शेअर

Nashik News: कडाक्याच्या थंडीमुळे २२ वर्षाच्या तरूणाचा मृत्यू, नाशिकमध्ये हळहळ

SCROLL FOR NEXT