Premachi Goshta Serial Promo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Premachi Goshta Serial: 'तू स्वतः कधीच आई होऊ शकत नाही...' आदित्य घर सोडून गेल्यावर सावनीने मुक्ताला सुनावले

Premachi Goshta Serial Promo: मराठी मालिकाविश्वातील प्रेमाची गोष्ट ही लोकप्रिय मालिका आहे. प्रेमाची गोष्ट मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी मालिकाविश्वातील प्रेमाची गोष्ट ही लोकप्रिय मालिका आहे. प्रेमाची गोष्ट मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मुक्ताच्या आईचा अपघात झाला आहे. हा अपघात आदित्यकडून झाला आहे. सागर आदित्यला वाचवण्यासाठी मुक्ताशी वारंवार खोटं बोलताना दिसत आहे. तर दुसरीकडे सावनी मात्र आदित्यच्या चुकीचा फायदा घेत सागर आणि मुक्ताला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. मालिकेच्या नव्या भागात आदित्य घर सोडून जाणार आहे. मालिकेचा नवीन भाग खूपच रंजक असणार आहे.

मालिकेच्या नवीन प्रोमोत आदित्य घर सोडून गेला आहे. सर्वजण आदित्यचा शोध घेत आहे. सागर खूपच जास्त घाबरलेला दिसत आहे. एकीकडे सागर आदित्यला शोधत आहे. तर दुसरीकडे इंद्रा मात्र मुक्ताला खूप ओरडते. इंद्रा म्हणते की, आदित्यला तू सोडून गेलीच कशी? तो आपल्याकडे राहत नाही म्हणून तू असं केलंस ना. तेवढ्यात सावनी तिथे येते आणि मुक्ताला खूप बोलते. सावनी म्हणते की, मुक्तामुळेच आदित्य गायब झालाय. तिला कसं काय वाटेल, तिच्या पोटचा पोरगा थोडी आहे आदित्य. तुला काय कळणार एका आईचं दुःख काय असतं ते. तुला कसं कळेला ना, तू तर कधी आईच होऊ शकत नाही.

मालिकेच्या येत्या भागात खूप गोष्टी बदलताना दिसणार आहे. मालिकेत कालच्या भागात आदित्य माधवीला भेटायला जातो. माधवीची वाईट अवस्था बघितल्यावर त्याला खूप वाईट वाटते. त्यामुळेच तो घर सोडून निघून जातो. आदित्य घर सोडून गेल्याचा दोष सर्वजण मुक्ताला देताना दिसत आहे.

मालिकेत माधवीचा अपघात झाला आहे. हा अपघात ज्या कारने झाला आहे. ती कार माधवी त्यांच्याच बिल्डिंगखाली पाहते. त्यामुळे माधवीला खूप त्रास होतो. हा त्रास मुक्ताला सहन होत नाही. त्यामुळे ती गुन्हेगाराला शोधण्याचा निर्णय घेते. मालिकेत येत्या काही दिवसांत सर्वकाही बदलताना दिसणार आहे. सागर मुक्ताला सत्य सांगणार का? मुक्ता गुन्हेगाराला शोधून काढणार का? आदित्यच्या अशी वागण्यामुळे मुक्ता- सागरच्या नात्यात काय बदल होणार असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

8th Pay Commission: पेन्शनर्ससाठी मोठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात होणार हे 6 मोठे बदल

Accident News : मुंबई बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात! वाहनांच्या जोरदार धडकेत २ जणांचा मृत्यू; १२ गंभीर जखमी

Ganpati Festival Rangoli Designs: गणपती स्वागतासाठी सोप्या आणि सुंदर 5 रांगोळ्या, ज्या पटकन होतील

Weight Loss : सकाळच्या नाश्त्यात चुकूनही खाऊ नका 'हे' ५ पदार्थ, झपाट्याने वाढेल वजन अन्...

SCROLL FOR NEXT