Marathi Natak Ashich Aahe Chitta Joshi Instagram
मनोरंजन बातम्या

Vaishali Samant News: वैशाली सामंतचं नव्या क्षेत्रात पदार्पण, ‘या’ नाटकातून करणार नव्या कामाचा श्रीगणेशा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ashich Ahe Chitta Joshi Theater News: आपल्या धडाडीच्या स्वभावातून अभिनेत्री मैथ्थिली जावकर सतत काहीतरी करत असते. अभिनय आणि निर्मिती नंतर आता ती लेखन दिग्दर्शनाकडे वळली आहे. ‘अशीच आहे चित्ता जोशी’ या नाटकाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली आहे. मनोरंजना सोबतच, आपली महान संस्कॄती व परंपरा यांची महती सांगणार हे नाटक आहे. या नाटकातून दिग्दर्शकीय पदार्पण करणाऱ्या मैथ्थिलीला साथ मिळाली ती गायिका वैशाली सामंत हिची.

गाण्यातून आणि संगीतातून आपलं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या वैशालीने प्रथमच एका नाटकासाठी गीत संगीताची जबाबदारी सांभाळली. ह्या नाटकातील धाकड गीताला (थीम साँग) गायिका वैशाली हिने संगीत दिलंय, आणि स्वतः ते गाणं गायलंय. या नाटकाच्या निमित्ताने मैथ्थिलीच दिग्दर्शकीय पदार्पण आणि वैशालीच नाटकासाठी प्रथमच संगीत देणं हा योग ‘अशीच आहे चित्ता जोशी’ या नाटकाने जुळवून आणला आहे. (Theater)

या गाण्याविषयी बोलताना वैशाली सांगते, हे गाणं करताना खूप धमाल आली. राजेश बामुगडे यांनी हे गीत खूप चांगल्यारीतीने शब्दबद्ध केलं आहे. आपल्या हक्कासाठी लढणार्‍या स्त्री पात्रासाठी अतिशय चपखल असं हे गाणं करताना एका स्त्री दिग्दर्शिकेचा दृष्टीकोन मला अधिक भावला. त्यामुळे हे गाणं आणि मैथ्थिली सोबत काम करणं माझ्यासाठी ही खूप छान अनुभव होता. (Marathi Actress)

मैथ्थिली सांगते, राज्यस्तरीय नाट्य लेखनाच्या एका स्पर्धेसाठी मी भाग घेतला होता. त्यात १७५ स्क्रिप्ट मधून माझं हे नाटक तिसरं आलं. यातूनच मला हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याची प्रेरणा मिळाली. माझ्या एका चित्रपटाच्या निमित्ताने वैशालीची भेट झाली होती. तिची एनर्जी आणि कामाचं पॅशन नाटकाच्या गाण्यासाठी परफेक्ट वाटली. आणि खरंच तिने हे गाणं खूप मस्त सादर केलं आहे. (Entertainment News)

ओम साईनाथ प्रॉडक्शन्स निर्मित, संस्कार भारती च्या सहयोगाने, स्मित हरी प्रकाशित वेगळ्या धाटणीच्या या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळत असून मैथ्थिली जावकर सोबत रणजीत जोग, रुचिर गुरव, रचना कदम यांच्याही नाटकात भूमिका आहेत. (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi In Thane: मराठी, मेट्रो अन् मविआ; ठाण्यात PM मोदींची विरोधकांवर चौफेर टीका

Pune Devi Temple : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे जम्मूच्या वैष्णो देवी मंदिराची प्रतिकृती

VIDEO : उद्धव ठाकरेंचा मोदी-शिंदेंवर 'ठाकरी बाण'

Marathi News Live Updates : काँग्रेसची ज्या राज्यात सत्ता येते ती राज्य उध्वस्त होतात, नरेंद्र मोदी

Fashion Tips : बॅगी जीन्ससोबत ट्राय करा 'हे' टॉप्स, फॅशन ट्रेंडमध्ये दिसाल स्टायलिश!

SCROLL FOR NEXT