Marathi Writer-Director Swapnil Mayekar Passes Away Saam TV
मनोरंजन बातम्या

Swapnil Mayekar Dies At The Age 46: चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच दिग्दर्शक हरपला, स्वप्नील मयेकर यांचे निधन

Marathi Writer-Director Passes Away: आज पहाटे स्वप्नील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

Pooja Dange

Swapnil Mayekar Passes Away: 'मराठी पाऊल पडती पुढे' या उद्या प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचे निधन झाले आहे. आज पहाटे स्वप्नील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. स्वप्नील अवघ्या ४६ वर्षाचे होते. स्वप्नील मुंबईतील चेंबूर घाटलागाव येथे राहत होते. त्यांच्यामागे त्यांची पत्नी आणि दोन मुली आहेत.

स्वप्नील यांचा आगामी चित्रपट 'मराठी पाऊल पडते पुढे' ५ मे रोजी म्हणजे उद्या प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवसआधी चित्रपटाच्या दिग्दर्शाचे निधन झाल्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. स्वप्नील गेले काही दिवस आजारी होते. (Latest News)

स्वप्नील यांनी 'हा खेळ संचिताचा' या मालिकेचे सहाय्य्क दिग्दर्शक म्हणून काम पहिले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी भोजपुरी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'मराठी पॉल पडते पुढे' हा स्वप्नील यांचा स्वतंत्र दिग्दर्शित पहिला मराठी चित्रपट होता.

खान्देशातील एका शेतकरी कुटुंबातील एक तरुण मुंबईत येऊन बिजनेसमॅन बनतो अशी या चित्रपटाची कथा आहे. स्वप्नील यांनी या चित्रपटातून त्यांची स्ट्रगल स्टोरी लेखन आणि दिग्दर्शनाच्या माध्यमातून मांडण्याच्या प्रयत्न केली आहे.

'मराठी पाऊल पडते पुढे' या चित्रपटाचं अभिनेता चिराग पाटील आणि अभिनेत्री सिद्धी पाटणे, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, अभिनेते सतीश सलागरे आणि संजय कुलकर्णी या कलाकारांनी काम केलं आहे. तसेच मराठी पाऊल पडते पुढे या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे स्वप्नील मयेकर यांनी त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा, नागपूरात चक्काजाम, प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरावर दरोडा, जळगावच्या घरातून सोनं, रोकड लंपास

IND VS AUS: एकमेव 'या' भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धुतलं, ठोकलं दमदार शतक

Maharashtra Flood: अतिवृष्टीग्रस्तांना आतापर्यंत 8 हजार कोटींची मदत, पुढच्या 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 11 हजार कोटी

Narayan Rane : ...म्हणून मी शिवसेना सोडली; भाजप खासदार नारायण राणेंनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT