Prashant Natki Wedding Song  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prashant Natki Wedding Song: प्रसिद्ध संगीतकाराने स्वत:च्याच लग्नातच शूट केली पाच गाणे; लग्नात आला रिल लाईफचा अनुभव

Prashant Natki Wedding News: सुपरहिट संगीतकार प्रशांत नाकटीने स्वतःच्या लग्नात एक नाही तर तब्बल ५ गाणी बनवली आहेत.

Chetan Bodke

Prashant Natki Wedding In 5 Songs: सध्याच्या सोशल मीडिया माध्यमातून आपण अनेक प्रीवेडींग फोटोशूट करताना जोडपी बघतो. पण सुपरहिट संगीतकार प्रशांत नाकटीने स्वतःच्या लग्नात एक नाही तर तब्बल ५ गाणी बनवली आहेत. त्याच्या लग्नाचं ५ गाण्यांनी सजलेलं 'लगीन सराई' हे मराठी गाणं प्रदर्शित झालं आहे.

मराठी आणि हिंदी म्युझिक अल्बम इंडस्ट्रीतील असं हे पहिलंच गाणं आहे. ज्याचं चित्रिकरण खऱ्याखुऱ्या लग्नात पार पडलं. या गाण्यात मेहंदी हाताला, हळदी अंगाला, दादूस सोय कर आपली, मंगलाष्टके आणि भावड्या अश्या ५ गाण्यांमध्ये प्रशांत नाकटी आणि प्रिया नाकटी यांच्या लग्नातील अविस्मरणीय क्षणांचा अनुभव प्रेक्षकांना घरबसल्या घेता येणार आहे. सध्या प्रशांतच्या लग्नातील गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Entertainment News)

गाण्याविषयी प्रशांत नाकटी म्हणतो, “माझं लग्न फार घाईघाईत ठरलं त्यामुळे प्रीवेडींग फोटोशूटसाठी माझ्याकडे वेळ नव्हता. म्हणून मी आणि माझ्या टीमने लग्नासाठी नवं गाणं करण्याचं ठरवलं. लग्नाच्या ५ दिवस अगोदर मी प्रथेनुसार कुठेही जाऊ शकतं नव्हतो. त्यामुळे मी आणि संकेतने घरातल्या सेटअपवर गाणी कम्पोज केली. माझ्या जवळचे काही कलाकार मित्र आहेत. ते म्हणाले आम्हालाही लग्नाच्या गाण्यात दिसायचंयं. म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून ही ५ वेगवेगळी गाणी करण्याचं ठरवलं.”

पुढे तो ५ गाण्यांविषयी सांगतो, “‘मेहंदी हाताला’ आणि ‘हळदी अंगाला’ ही दोन गाणी गायिका सोनाली सोनावणे हिने गायली आहेत तर ‘दादूस सोय कर आपली’ हे गाणं गायक परमेश माळीने गायलं आहे. ‘मंगलाष्टके’ आणि ‘भावड्या’ ही दोन्ही गाणी रवींद्र खोमणे याने गायली आहेत. या गाण्याची कोरिओग्राफी जयेश पाटील याने केली आहे. तर लग्नातील काही सीन्स प्रशांच्या राहत्या घरात चित्रीत झाले आहे. निक शिंदे, रितेश कांबळे, तृप्ती राणे, सोनाली सोनावणे असे २०० हून अधिक कलाकार प्रशांत आणि प्रिया नाकटीच्या लग्नाला उपस्थित होते.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT