Omi Vaidya's New Marathi Movie Aaicha Gavat Marathit Bol Teaser Out Social Media
मनोरंजन बातम्या

Marathi Movie Teaser: मराठी चित्रपटातही 'चतुर' करणार 'चमत्कार'; आईच्या गावात मराठीत बोल'चा टीझर प्रदर्शित

3 idiots fame Omi Vaidya in Marathi Movie: "आईच्या गावात मराठीत बोल" या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. या चित्रपटातून थ्री इडियट्स फेम ओमी वैद्य मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे. हा चित्रपट १९ जानेवारी, २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य , संस्कृती बालगुडे, पार्थ भालेराव, विद्याधर जोशी, दिसत आहे.

Bharat Jadhav

Marathi Movie Teaser Aaicha Gavat Marathit Bol:

"आईच्या गावात मराठीत बोल" या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. टीझरमध्ये ओमी वैद्यची मराठी ऐकून या टीझरची मोठी चर्चा सुरू झालीय. या चित्रपटातून थ्री इडियट्स फेम ओमी वैद्य मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे. टीएटीजी फिल्म्स एलएलपी निर्मित "आईच्या गावात मराठीत बोल" या चित्रपटाची प्रदर्शनाआधीच जोरदार चर्चा सुरू झालीय. या चित्रपटाचा टीझरने सगळ्यांना हसायला लावले आहे. हा चित्रपट १९ जानेवारी, २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. (Latest News)

ओमीने याआधी 'थ्री इडियट्स' या हिंदी सिनेमात 'चतुर' नावाचं पात्र साकारलं होतं. या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी भाषिकांमध्ये आपला असा चाहता वर्ग याआधीच निर्माण केलाय. आता ओमी मराठी प्रेक्षकांचं मन जिंकण्यास तयार झालाय. पहिल्याच मराठी सिनेमात त्याने दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दुहेरी भूमिका साकारत आहे. आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळत ओमीने मराठीतील दिग्गज कलाकारांच्या साथीने अभिनयाची देखील उत्तम छाप सोडल्याचे दिसत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आईच्या गावात मराठीत बोल' या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य, संस्कृती बालगुडे, पार्थ भालेराव, विद्याधर जोशी, इला भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, नेहा कुलकर्णी, ओंकार थत्ते, ध्रुव दातार,सायली राजाध्यक्ष, सुधीर जोगळेकर असे कसलेले कलाकार आहेत.

या चित्रपटाची निर्मिती अहमद लुकान, डॉ. जलदीप दलूत, पीट टॉरमे, नंदिनी मिनॉशे, समिया अश्रफ, डॉ. पुनीत चांडक, डॉ. सुमुल रावल, माँटी आणि तनु पांडे, संतोष गोविंदाराजू, मार्थेश्वरन सोलामुथू, माईक कासिन, जसलीन अहलुवालिया राजन वासुदेवन,राजीव आणि शीतल शाह,संजय सहगल, शाहीन गांधी, स्टीव्हन मोरलँड, सुप्रतीम डे, उदय कुमार यांनी केलीय.

ओमी वैद्यच्या अभिनय कारकि्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाच्या गणेश उत्सवातील नाटकाने झाली होती. अभिनयावरील प्रेमापोटीच ओमीने अमेरिका ते भारत हा मोठा प्रवास केला. ओमीने टीझरमध्ये इतर मराठी कलाकारांसोबतचा त्याचा वावर एकदम सहज वाटतो आहे. ओमी आणि त्याच्या संचातले सगळे गुणी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतील याबाबत शंका वाटत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

Trump Putin Summit : भारतावरचा टॅरिफ रद्द होणार? ट्रम्प-पुतीन भेटीत काय घडलं?

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवात ७५ गोविंदा जखमी, काहींची प्रकृती गंभीर, एकाचा मृत्यू

Dog Bite: दिसेल त्याचे तोडले लचके;इंदापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ,सीसीटीव्हीत घटना कैद

SCROLL FOR NEXT