Satyashodhak Teaser Out  Saam TV
मनोरंजन बातम्या

Marathi Movie News: विद्येचे महत्त्व सांगणाऱ्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा संघर्ष मोठ्या पडद्यावर; 'सत्यशोधक' चित्रपटाचा टीझर रिलीज

Satyashodhak Movie: ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले त्यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Pooja Dange

Satyashodhak Movie Teaser Out:

समाजात महिलांना मनाचा स्थान मिळावं यासाठी ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांनी खूप कष्ट सोसले. त्यांच्यामुळे स्त्रिया शिकल्या आणि आज समाजात मानाने वावरत आहेत. स्त्रियांना मानाने जगायला ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले त्यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकताच या चित्रपटाचं टीझर लाँच झाला आहे. खासदार शरद पवार यांच्या हस्ते टीझर लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटात ज्योतिराव फुलेंच्या प्रमुख भूमिकेत संदीप कुलकर्णी दिसणार आहेत.

संभाजी ब्रिगेड-भारत मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘सत्यशोधक संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने संमेलनात ‘सत्यशोधक’ या चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यात आला.

या संमलेनाचे उद्घाटक खा. शरद पवार यांच्या हस्ते हा टिझर लॉन्च करण्यात आला. ‘विद्येविना मती गेली, मतिविना निती गेली...’ अशा कठोर शब्दांत शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या ज्योतिबा फुलेंच्या आवाजाने आणि मिशनरी शाळेच्या दृशांनी टीझरची सुरुवात होते. त्यावेळची समाजाची स्थिती या टीझरमध्ये दाखविणात आली आहे. (Latest Entertainment News)

या चित्रपटामधेय ज्योतिबा फुलेंच्या आयुष्यातील संघर्ष मोठ्या पडद्यावर दाखविण्यात येणार आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल. अभिनेते संदीप कुलकर्णींसह राजश्री देशपांडे, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी ही कलाकार चित्रपटात दिसणार आहेत.

समता फिल्म्स प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूर वाघ हे आहेत.

तर सहनिर्माते राहुल वानखडे, बाळासाहेब बांगर, हर्षा तायडे,प्रतिका बनसोडे आणि प्रमोद काळे हे आहेत. महेश भारंबे, शिवा बागुल हे कार्यकारी निर्माते आहेत. ‘सत्यशोधक’ हा चित्रपट आगामी दिवाळीत आपल्या भेटीस येईल. (Celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divya Deshmukh : वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली महाराष्ट्र कन्या कोण? दिव्या देशमुखबद्दल जाणून घ्या!

Mumbai Crime: मुंबई पोलिसांकडून ड्रॅग्सची फॅक्टरी उद्ध्वस्त; ४०० कोटींचे अंमली पदार्थ जप्त, कर्नाटक कनेक्शन उघड

Methi Pani: दररोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्यास शरिरात काय बदल होतात?

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे घेणार लोकमान्य टिळक यांचे पनतु दिपक टिळक यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

Farmer : पत्नी विठ्ठल दर्शनाला पंढरपुरात; शेतात जात पतीने उचलले टोकाचे पाऊल

SCROLL FOR NEXT