Journey Trailer You Tube
मनोरंजन बातम्या

Journey Trailer: असामान्य संघर्षाची थरारक कथा सांगणाऱ्या ‘जर्नी’चा ट्रेलर प्रदर्शित

Journey Trailer News: थरारक, भावनिक आणि कौटुंबिक कथेवर आधारलेल्या ‘जर्नी’चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

Chetan Bodke

Journey Trailer

भावनिक आणि कौटुंबिक कथेवर आधारलेल्या ‘जर्नी’चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. एका असामान्य संघर्षाच्या प्रवासाची गोष्ट उलगडणारा चित्रपट येत्या ६ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सचिन जीवनराव दाभाडे दिग्दर्शित, निर्मित आणि सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत चित्रपटाचा गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्टर प्रदर्शित झाला होता.

चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल फारच उत्सुकता होती. अखेर प्रेक्षकांच्या भेटीला या थरारक, भावनिक आणि कौटुंबिक कथेवर आधारलेल्या ‘जर्नी’चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत शंतनु मोघे, शर्वरी जेमेनिस, शुभम मोरे, अंजली उजवणे, योगेश सोमण, ओमकार गोवर्धन, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने, माही बुटाला, निखिल राठोड हे कलाकार दिसणार आहेत. सचिन दाभाडे यांची कथा असणाऱ्या चित्रपटाचे लेखन रवींद्र मठाधिकारी यांनी केले आहे. तर भास्कर देवेंग्रेकर, तानाजी माने, संतोष राठोड, अनिकेत अरविंद बुटाला हे ‘जर्नी’ चे सहनिर्माते आहेत. (Actors)

‘जर्नी’च्या थरारक ट्रेलरमध्ये, एक मुलगा बेपत्ता झाल्याचे दिसत आहे, बेपत्ता झालेल्या मुलाचे पालक त्याला शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आता हा मुलगा खरोखरच बेपत्ता झाला आहे का?, तो त्याच्या पालकांवर रूसून निघून गेला आहे का? हा बेपत्ता झालेला मुलगा नक्की कुठे आहे?, अवघड वाटेवर त्याला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार?, आणि हा प्रवास त्याला कुठे घेऊन जाणार?, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या येत्या १३ ॲाक्टोबरला मिळणार आहे. (Entertainment News)

चित्रपटाविषयी दिग्दर्शक सचिन दाभाडे सांगतात, “ ‘जर्नी’ चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. आयुष्यातील, नात्यांमधील आणि कुटुंबातील असलेला संघर्ष यानिमित्ताने उलगडणार आहे. ‘जर्नी’ प्रेक्षकांना बरंच काही देणार आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच गोष्टी मागे सुटत आहेत. त्याच पुन्हा परत आणण्याचा प्रयत्न ‘जर्नी’मध्ये करण्यात आला आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यासोबत हा चित्रपट आवर्जून पाहावा.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT