सध्या बॉलिवूडमध्ये सिक्वेलची प्रचंड चर्चा होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून बॉलिवूडमध्ये अनेक सिक्वेलने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. आता बॉलिवूडनंतर मराठी सिनेसृष्टीतसुद्धा सिक्वेलची प्रचंड चर्चा होत आहे. गेल्या वर्षी मराठी सिनेसृष्टीमध्ये ‘दगडी चाळ २’ आणि ‘बॉईज ३’ प्रदर्शित झाला होता. त्यातील दोन्हीही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे.
चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी ‘बॉईज ४’ची घोषणा केली होती. चित्रपटाच्या सिक्वेलची गेल्या वर्षापासूनच चर्चा सुरु आहे. नुकतंच सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
‘बॉईज ४’मध्ये आता प्रेक्षकांना ढुंग्या, धैर्या आणि कबीर हे तीन पात्रच नाही तर, आणखी दमदार कलाकारांची स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. पार्थ भालेराव, प्रतिक लाड, सुमंत शिंदे, रितीका श्रोत्री, अभिनय बेर्डे, यतिन कार्येकर, समीर धर्माधिकारी, गौरव मोरे, निखिल बने, जुई बेंडखले, ऋतुजा शिंदे, ओम पाटील अशी स्टारकास्ट आपल्याला चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. पण जरीही चित्रपटामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली असली तरी, काही प्रेक्षक चित्रपटामध्ये ओंकार भोजने नसल्यामुळे नाराज झाले आहेत. (Actors)
ओंकारने ‘बॉईज २’ आणि ‘बॉईज ३’मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. त्याने चित्रपटात नरु भोंडवेचे पात्र साकारले होते. ढुंग्या, धैर्या आणि कबीर या तीनही पात्रांप्रमाणे त्याच्याही पात्राची सोशल मीडियावर चर्चा होत होती. नुकताच ‘बॉईज ४’चा टीझर प्रदर्शित झाला. टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित होताच अवघ्या काही वेळातच पसंती मिळाली. खलनायकाच्या भूमिकेमुळे प्रचंड चर्चेत आलेल्या ओंकारला चित्रपटात न घेतल्यामुळे चाहते काहीसे नाराज झालेले दिसत आहे.
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या टीझरवर प्रेक्षकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. चित्रपटाची कथा पाहून प्रेक्षकांनी निर्मात्यांसह दिग्दर्शकांचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर कमेंटच्या माध्यमातून चाहत्यांनी ओंकार भोजने कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर आणखी एक म्हणतो, नरु शेट पाहिजे राव, तर आणखी एक चाहता म्हणतो, गौरव येणार तर धमाका होणार पण धमक्याला आग लावायला ओमकार भाऊ तर पाहिजे ना राव नायतर फिल्म तर फ्लॉप होणार कोणाला मजाच नाय येणार, अशा कमेंटच्या माध्यमातून युजर्सने नाराजी दर्शवली. ओंकार भोजने नेमका चित्रपटात दिसणार की नाही? हे प्रदर्शनाच्या दिवशीच कळेल.
‘बॅाईज’ हा मराठी सिमेसृष्टीतील पहिला चित्रपट आहे, ज्याचे आतापर्यंत चार भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. प्रेक्षकांना प्रत्येक भागात काहीतरी सरप्राईज पाहायला मिळत आहे. आता ‘बॅाईज ४’ मध्येही प्रेक्षकांना काही तरी नवीन पाहायला मिळणार हे नक्की. चित्रपटामध्ये कोण कोणती व्यक्तिरेखा साकारणार?, कोण काय काय धमाल करणार?, याचं उत्तर आपल्याला २० ॲाक्टोबरलाच मिळेल. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत तर विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.