मराठी सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी येत आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे यांचे आजोबा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते अरविंद काणे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. अरविंद काणे मराठी रंगभूमीसह टेलिव्हिजनसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी नात गौतमी देशपांडेसोबत ‘माझा होशील ना’ या मालिकेमध्ये काम केलं होतं. आजोबांच्या निधनाचं वृत्त स्वत: अभिनेत्री गौतमीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलं आहे.
गौतमीने आजोबांसाठी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. तिने पोस्टच्या माध्यमातून दोन्ही बहिणींचंही आजोबांसोबत नातं कसं होतं, हे सांगितंल आहे. अरविंद काणे यांनी १९५३ पासून मराठी रंगभूमीवर काम करण्यासाठी सुरुवात केली. अभिनेत्रीने शेअर केलेली आजोबांची भावूक पोस्ट प्रचंड चर्चेत आली आहे.
गौतमी देशपांडे पोस्टमध्ये म्हणते, “प्रिय आजोबा, पत्रास कारण की, आज तुमच्या आयुष्याच्या तिसऱ्या अंकाचा पडदा पडला ! आज माझ्या आजोबांची, आईच्या मामाचा बाबांची, आज्जीच्या प्रेमळ नवऱ्याची, उत्तम भावाची, आदर्श मुलाची अशा सगळया भूमिका असलेलं तुमच तीन अंकी नाटक इथेच संपलं..... पण आजोबा काय सांगू तुम्हाला.... इतक्या कमाल वठवल्यात तुम्ही सगळ्या भूमिका !” (Actors)
गौतमी देशपांडे पुढे पोस्टमध्ये म्हणते, “प्रत्येक भूमिकेच वेगळेपण जपलं तुम्ही. कथानक पण काय सुंदर आणि नाट्यमय होतं हो नाटकाचं.... सुरूवात झाली ती स्वतःचे वडील जाण्यापासून.... नंतर आईचा पुन:र्विवाह.... नवीन कुटुंबामध्ये प्रवेश.... नवीन भावांचं सख्ख्यांपेक्षा जास्त प्रेम.... तुमच्यासारख्या हँडसम नायकाला साजेल अशा सुंदर नायिकेचा आयुष्यात प्रवेश..... नायकाचं नाटकाविषयाचं प्रेम, लग्न, दोन गोड मुलांचा जन्म, सारंच कथानक एखाद्या फिल्मला लाजवेल असं....” (Actor)
“तुमचे एक एक प्रवेश पण काय लाजवाब आजोबा ... "एखाद्याचं नशीब" म्हणत एक सुंदर नायिका आयुष्यात अली ...नकळत पणे मनाचे धागे जुळत गेले . मग " याला जीवन ऐसे नाव" म्हणत तुम्ही पुढे गेलात ... "अशी पाखरे येति" म्हणत संसार सुरु झाला .... "नाटककराच्या शोधात तुम्ही सहा पात्र" फिरत गेलात ....पुढे "शेहेनशाह" बनून तुम्ही "नटसम्राट" असल्याचा दाखवून दिलंत .... दुःखांकडे पाठ फिरवत हसतमुखानं "तो मी नव्हेच " म्हणत राहीलात .... असे आयुष्याचे खरे खुरे "किमयागार " ठरलात ..... "चाणक्य " बुद्धीने सतत आरोग्यक्षेत्राला योगदान देत आलात .... तीन अंक कुठे कसे संपले कळलंच नाही .....” (Serial)
गौतमी देशपांडे पोस्टच्या शेवटच्या भागात म्हणते, “प्रेक्षक प्रत्येक नाटकातून काही ना काही घेऊन जातो ... यातून काय बरोबर घेऊन जाऊ अन काय नको असा वाटतंय .... त्यामुळे हे नाटकच आता सोबत ठेवणारोत आयुष्यभर .... तुम्ही आता मात्र शांत व्हा ....दमला असाल तुम्ही .... आता खऱ्या अर्थानी पडदा पडला आहे ...नाटक संपल्यानंतर तो तुमच्यातला नट आता शांत आणि समाधानी आहे .... तुमच्यातला हा 'नट " आम्ही आमच्यात आयुष्यभर जागा ठेवू .... अन तुमच्या 10% तरी चांगुलपणा आणि सकारात्मकता आमच्यात यावी अशी प्रार्थना करू .... तुमच्याच एका प्रवेशातल हे वाक्य ....झालेत बहू ,असतील बहू , होतील बहू ,पण या सम हा ....!! रंगदेवतेला वंदन करून हा तीन अंकी प्रवेशाचा पडदा पडला असं जाहीर करते....अन त्या नटसम्राटास पुन्हा एकदा वंदन करते .... तुमची नात आणि तुमची फॅन गौतमी...” (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.