Jhimma 2 Teaser Instagram
मनोरंजन बातम्या

Jhimma 2 Teaser: ‘झिम्मा २’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, यावेळी सात मैत्रिणी परदेशात करणार धम्माल

Jhimma 2 Teaser: हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे.

Chetan Bodke

Jhimma 2 Teaser Released

जिओ स्टुडिओज आणि आनंद एल. राय प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’चा जबरदस्त टीझर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. हा टीझर सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला असून सात जणींच्या सात तऱ्हा टिझरमध्ये पाहायला मिळत आहे.

शेअर केलेल्या टीझरमध्ये सिद्धार्थ चांदेकर “यावेळेला खूपच व्हरायटी आहे.” असा डायलॉग म्हणते. ‘झिम्मा’च्या सिक्वेलमध्ये महिलांच्या ताफ्यामध्ये आणखी दोन मैत्रिणी सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा इंद्रधनुष्याचे सात वेगवेगळे रंग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. मागच्यावेळेस नवीनच मैत्री झाली होती, हळूहळू ती बहरत गेली. आणि आता ‘झिम्मा २’मध्ये ही मैत्री अधिकच परिपक्व झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी मनोरंजनरूपी यंदाची ही सहल अधिकच अविस्मरणीय ठरू शकते!

चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्यासोबत आता रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोघीही दाखल झाल्या आहेत. (Actress)

चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘झिम्मा’मधील या पाच मैत्रिणींना प्रेक्षकांना आपलेसे केले आणि सुपरहिटची मोहर उमटवली. आयुष्यामध्ये स्वतःसाठी काही क्षण देणे, किती आवश्यक आहे, याची जाणीव ‘झिम्मा’ने दिली. हेच ‘स्वत्त्व’ शोधायला लावणारा हा चित्रपट पुन्हा जोमाने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Films)

“यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’ला सर्वच वयोगटातल्या प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. ‘झिम्मा’पाहून अनेक महिलांनी, ज्या कधी कुटुंबाशिवाय बाहेर फिरल्या नाहीत, त्यांनी स्वतःमैत्रिणींसोबत सहली आयोजित केल्या. प्रेक्षकांनी मेसेजद्वारे, प्रत्यक्ष भेटून आम्हाला ‘झिम्मा २’ यावा, अशी मागणीही केली. प्रेक्षकांच्या या दमदार प्रतिसादामुळेच आम्ही ‘झिम्मा २’साठी प्रेरित झालो आणि चांगली कथा तयार झाली. प्रवासात आपण असे मित्र बनवतो जे कदाचित रोज भेटणार नाहीत, पण मागच्या खेपेला जिथं थांबलं होतं तिथनं पुन्हा सुरू होतात! याच कल्पनेवर आधारित ही ‘रियुनियन’ दुपटीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार, हे नक्की !” चित्रपटाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमेने अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli News : गडचिरोलीच्या श्वेताचा दुबईत डंका; आशियाई पॅरा गेम्समध्ये केला ऐतिहासिक पराक्रम

Kitchen Hacks : वॉशिंग मशीन नियमित साफ कशी करावी? जाणून घ्या स्मार्ट टिप्स

Maharashtra Live News Update: कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

Neha Kakkar: 'कँडी शॉप' गाण्यातील अश्लील डान्समुळे नेहा कक्कर ट्रोल; नेटिझन्स म्हणाले, 'देशाच्या संस्कृतीला कलंकित...'

Malad Tourism: गुलाबी थंडी अगदी जवळच फिरायला जायचंय? मग मालाडमधील या जागा ठरतील बेस्ट ऑप्शन

SCROLL FOR NEXT