Delivery Boy Movie New Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Delivery Boy Movie: हृता आणि प्रथमेशच्या 'डिलिव्हरी बॉय'चे नवीन पोस्टर आऊट, प्रेक्षकांना पडलेत अनेक प्रश्न

Delivery Boy: या चित्रपटाच्या भन्नाट पोस्टर आणि टीझरनंतर आणखी एक नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत. हृता आणि प्रथमेशच्या 'डिलिव्हरी बॉय'ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Priya More

Hruta Durgule And Prathamesh Parab:

मराठी सिनेसृष्टीची (Marathi Film Industry) प्रसिद्ध अभिनेत्री हृता दुर्गळे (Hruta Durgule) आणि सर्वांचा लाडका दगडू अर्थात प्रथमेश परब (Prathamesh Parab) लवकरच 'डिलिव्हरी बॉय' (Delivery Boy Movie) या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या भन्नाट पोस्टर आणि टीझरनंतर आणखी एक नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत. हृता आणि प्रथमेशच्या 'डिलिव्हरी बॉय'ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

मोहसीन खान दिग्दर्शित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे एक नवीन गंमतीशीर पोस्टर आपल्या भेटीला आले आहे. पोस्टरमध्ये प्रथमेश परबच्या हातातील गिफ्टबॉक्समध्ये एक गोंडस बाळ दिसत आहे. त्याच्या बाजूला पृथ्विक प्रताप आणि डॅाक्टरच्या वेषात अंकिता लांडे पाटीलही दिसत आहे. त्यामुळे आता प्रथमेश या बाळांची डिलिव्हरी करणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर प्रेक्षकांना पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर येत्या ९ फेब्रुवारीला चित्रपट रिलीज झाल्यानंतर मिळणार आहे.

सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन निर्मित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत. तर फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रतापसोबत अंकिता लांडेही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 'डिलिव्हरी बॉय'मधून प्रथमेश परब एका वेगळ्याच लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटातील त्याचा नवा अंदाज चाहत्यांना नक्कीच आवडत आहे.

दिग्दर्शक मोहसीन खान यांनी या चित्रपटाबद्दल सांगितले की, 'या चित्रपटातून एक वेगळा विषय मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सरोगसीसारख्या नाजूक विषयावर भाष्य करणाऱ्या आमच्या या चित्रपटातून प्रेक्षकांना संदेश देण्याचा एक प्रयत्न आहे. मात्र हे करताना या विषयाचे गांभीर्य जपत आम्ही त्याला विनोदाची साथ दिली आहे.’ हा चित्रपट सरोगसीवर भाष्य करणार आहे. आता प्रथमेश परब आणि त्याचा जोडीदार गावातील महिलांना सरोगसीसाठी तयार करतो की आणखी अडचणी मागे लावून घेतो हे आपल्याला ९ फेब्रुवारीला कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT