Amruta Khanvilakr
Amruta Khanvilakr  Instagram/ @amrutakhanvilkar
मनोरंजन बातम्या

Har Har Mahadev: अमृता साकारणार पहिल्यांदाच ऐतिहासिक पात्र; लूकने वाढली चित्रपटाची उत्सुकता !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: यंदाची दिवाळी शिवभक्तांकरिता खास असणार आहे. बाजीप्रभू देशपांडेंच्या शौर्य आणि पराक्रमाची गाथा सांगणारा 'हर हर महादेव' चित्रपट येत्या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर २५ ऑक्टोबर (Latest Marathi News) रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटात शरद केळकर बाजीप्रभूंच्या मुख्य भूमिकेत, सुबोध भावे (Marathi Actors) पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील गाणे गायक सिड श्रीराम यांच्या आवाजात प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंदीस उतरत आहेत. अद्यापही बरेच चित्रपटातील चेहरे गुलदस्त्यातच आहे.

चंद्रमुखी फेम अमृता खानविलकर (Marathi Actress) 'हर हर महादेव' चित्रपटात (Marathi Movie) ऐतिहासिक मुख्य भूमिकेत झळकणार आहे. बाजीप्रभू देशपांडेंना आयुष्यभर साथ देणाऱ्या पत्नीची भूमिका यंदा अमृता खानविलकर साकारणार आहे. सिनेमातील अमृताच्या सोनाबाई देशपांडेंच्या पहिल्या लूकने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.भारतीय चित्रपटसृष्टीत कधीही न घडलेला प्रयोग या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

पहिल्यांदाच मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड या पाच प्रमुख भाषेंमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सुलतानी संकटातून स्वातंत्र्याचे मा जिजाऊंनी पाहिलेले स्वप्न, हजारो शत्रूंवर आपले मुठभर मावळ्यांनी मिळवलेला विजय आणि बाजीप्रभू देशपांडेंच्या रणझुंजारी कामगिरीवर भाष्य करणारा चित्रपट 'हर हर महादेव'. मनोरंजन क्षेत्रात जबरदस्त अनुभव असलेल्या कलाकारांचा हा चित्रपट असल्याची ओळख आहे.

चित्रपटाची चाहत्यांसोबतच मनोरंजन क्षेत्रातील मंडळींनाही खूप उत्सुकता लागली आहे. दमदार स्टारकास्ट असलेल्या चित्रपटात कोणकोणते कलाकार असणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मतदानाची का होतेय चर्चा?

Dindori Loksabha Election: दिवस मावळला तरी मतदार येईना; एकही मत न देणारं मेव्हणं गाव आलं चर्चेत

Rahu Gochar Effect: या राशींवर 2025 पर्यंत राहणार राहूची कृपा; प्रकृती चांगली राहील, खूप प्रगती होणार

HIV Vaccine : वैद्यकीय क्षेत्रातून आनंदाची बातमी! HIV वरील व्हॅक्सिनची यशस्वी चाचणी

किंमत फक्त 65,514 रुपये! वजन 93 किलो, मायलेज 50; जबरदस्त आहे TVS ची ही स्कूटर

SCROLL FOR NEXT