Marathi Movie Ghoda Trailer Saam TV
मनोरंजन बातम्या

Ghoda Trailer Out: बाप-लेकाच्या नात्यावर आधारित 'घोडा' चित्रपटाचा दमदार ट्रेलर नक्की पाहा

परिवाराच्या सुखासाठी पळणारा बाप आणि त्याची कहाणी म्हणजे 'घोडा' हा चित्रपट.

Pooja Dange

Marathi Movie Ghoda Trailer Out: दर्जेदार चित्रपटाची सध्या रांगच लागली आहे. 'वेड' आणि 'वाळवी' या चित्रपटननी नवीन वर्षात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. आता आणखी एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'घोडा' असे या चित्रपटाचे नाव आहे.

'घोडा' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. गरिबी पाचवीला पुजलेल्या बापाचा संघर्ष या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. परिवाराच्या सुखासाठी पळणारा बाप आणि त्याची कहाणी म्हणजे 'घोडा' हा चित्रपट.

मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी, अहोरात्र मेहनत करून धडपडणाऱ्या वडिलांची, वडील-मुलाच्या नात्याची विलक्षण गोष्ट "घोडा" या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेक महोत्सवांमध्ये कौतुक झालेला हा चित्रपट १७ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

बांधकाम मजुराचा मुलगा शेजारी राहणाऱ्या मुलासाठी आणलेला घोडा पाहून तसाच घोडा आणण्याची मागणी करतो. पण आर्थिक परिस्थिती बिकट असलेले त्याचे वडील आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करू शकतात का ? परिवाराच्या सुखासाठी झटणाऱ्या बापाची अनोखी कहाणी घोडा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत आतापर्यंत अनेक बाप आणि मुलाच्या नातेसंबंधावर आधारित चित्रपट झाले असले तरी हा चित्रपट नक्कीच वेगळा आहे. कष्टकरी आणि भांडवलदारी वर्ग यांच्या लढ्यात फुलणारं एक गोड स्वप्न म्हणजे "घोडा" हा चित्रपट.

हृदयस्पर्शी कथानक, कसदार लेखन, उत्तम कलाकार असलेला हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्याही तितकाच दमदार आहे, असा निर्माते दावा करत आहेत. परंतु ट्रेलर पाहिल्यानंतर तुमचे "घोडा" या चित्रपटाविषयीचं कुतूहल नक्कीच वाढेल यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MMRDA : समृद्धीवरून थेट मुंबईत पोहोचता येणार, एमएमआरडीएचा नवा प्लॅन काय ?

Maharashtra Live News Update: काँग्रेसला सोबत घ्या, राज ठाकरेंची इच्छा

शिंदे सेनेच्या फरार नेत्यावर गुन्हा; रॅप साँग, गँगस्टर अन् PP कंपनीचा उल्लेख; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल

प्रणित मोरेनंतर 'Bigg Boss 19'च्या घरात प्रसिद्ध कॉमेडियनची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Metro Viral Reel : मेट्रोमध्ये तरुणीची रिलबाजी, नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप; Viral Video

SCROLL FOR NEXT