Marathi Movie Get Together Teaser Out Saam TV
मनोरंजन बातम्या

Get Together Teaser Out: पहिल्या प्रेमाच्या आठवणींचे होणार 'गेट टूगेदर'; चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

New Marathi Movie Get Together: 'गेट टूगेदर' चित्रपटाचा नॉस्टेल्जिक करणारा टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Pooja Dange

Marathi Movie Teaser Out: पाहिलं प्रेम खास असतं. पण ते प्रत्येकाच्या आयुष्यात येत असं नाही आणि जर आलंच त ते मिळतच असं नाही. पण हे पहिले प्रेम कायम लक्षात राहतं. याच पहिल्या प्रेमाची आठवण करून देण्याचा प्रयत्न "गेट टुगेदर" या मराठी चित्रपटात करण्यात आला आहे.

या चित्रपटाचा नॉस्टेल्जिक करणारा टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे. उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात तुम्हाला दिसणार आहे. येत्या १९ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सतनाम फिल्म्स प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाची पटकथा, लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केले आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलं असून सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, जावेद अली गायिका आर्या आंबेकर, प्रियांका बर्वे यांनी चित्रपटातली सुमधुर गाणी गायली आहेत.

पावसाळी वातावरणात एकांतात असलेलं जोडपं टीझरमध्ये दिसतं आणि पहिल्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या संवाद ऐकू येतो. भर पावसात बाईक पार्क करून आडोशाला अंधारात हे जोडपं उभं असतं. तर मागून बॅकग्राऊंड व्हॉइस आहे. टीझरमध्ये तुम्हाला संपूर्ण चित्रपटाचे कथानक स्पष्ट होते. टीझर पाहून चित्रपटाची काय असेल? याविषयीची उत्सुकता निर्माण होईल. (Latest Entertainment News)

"देवमाणूस" या गाजलेल्या मालिकेतील एकनाथ गिते, अॅटमगिरी, वाघेऱ्या अशा चित्रपटात काम केलेली श्रेया पासलकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेतील त्रिशा कमलाकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. (Marathi Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, VIDEO होतोय व्हायरल

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Raj Thackeray: 'यांना मुंबई हे नाव खटकतंय...' केंद्रीय मंत्र्याला राज ठाकरेंनी झापलं

Guru Gochar 2025: पुढच्या वर्षी या राशींवर गुरुची राहणार कृपा; अडकलेला पैसा आणि नवी नोकरीही मिळू शकते

Pune News: पुण्यात बिबट्यानंतर माकडांची दहशत, सोसायटीत माकडांची घुसखोरी

SCROLL FOR NEXT