Ye Re Ye Re Paisa 3 Muhurt Saam TV
मनोरंजन बातम्या

Ye Re Ye Re Paisa 3: 'ये रे ये रे पैसा ३'मध्ये दिसणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'तील कलाकार; चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात

Ye Re Ye Re Paisa 3 Movie Muhurt: संजय जाधव दिग्दर्शित 'ये रे ये रे पैसा ३'च्या शुटिंगला आजपासून सुरूवात झालेली आहे. तब्बल पाच वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर 'ये रे ये रे पैसा ३'ची निर्मात्यांकडून घोषणा करण्यात आलेली आहे.

Chetan Bodke

संजय जाधव दिग्दर्शित 'ये रे ये रे पैसा ३'च्या शुटिंगला आजपासून सुरूवात झालेली आहे. २०१८ मध्ये रिलीज झालेल्या 'ये रे ये रे पैसा'चा सिक्वेल आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २०१८ मध्ये तर दुसरा भाग २०१९ मध्ये रिलीज झाला होता. आता तब्बल पाच वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर 'ये रे ये रे पैसा ३'ची निर्मात्यांकडून घोषणा करण्यात आलेली आहे. नुकताच चित्रपटाचा मुहूर्त आमदार योगेश टिळेकर, निर्माते- दिग्दर्शक अभिजीत पानसे, मनसे नेते संदीप देशपांडे, नानूभाई जयसिंघानी यांच्या हस्ते पार पडला.

मुहूर्त दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 'इट्स मज्जा' या इन्स्टाग्राम पेजवर सध्या शुटिंग दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना अनेक नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर अशी तगडी स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटातुन भेटीला येणार आहे.

अमेय विनोद खोपकर एलएलपी, उदाहरणार्थ निर्मित आणि न्युक्लिअर ॲरो या निर्मिती संस्थांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, निर्मिती संस्थांचे सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ हे या चित्रपटचे निर्माते आहेत.

तर निनाद नंदकुमार बत्तीन हे सहनिर्माते आहेत . चित्रपटाची पटकथा सुजय जाधव यांची आहे, तर संवाद लेखन अरविंद जगताप यांनी केलं आहे. विनोदी कथानक असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केलेली आहे.

पैसा मिळवण्यासाठीची धडपड आणि त्यातून होणारे गोंधळ या कथानकावर आधारित हा चित्रपट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Back Designs: साध्या साडीपासून पार्टी वियर साडीपर्यंत; ब्लाउजच्या या 7 फॅन्सी बॅक डिझाईन्स करा ट्राय

Maharashtra Live News Update: अमरावती विमानतळावर ‘नाईट लँडिंग’ सुविधा एप्रिलपासून होणार सुरू

Eye Yoga Exercise: चष्मा कधीच लागणार नाही, घरीच करा हे 5 योगा

मराठवाड्यातील भयान वास्तव! महिन्यात ७६ शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले, सर्वाधिक संख्या बीडमधील

Viral Video: ४ वर्षांचा चिमुकला अंगणवाडीतच अडकला; आई-बाप रात्रभर शोधत बसले, सकाळी कुलुप उघडलं...!

SCROLL FOR NEXT