Dhondi Champya- Ek Prem Katha Music Launch Event  Saam TV
मनोरंजन बातम्या

Dhondi Champya- Ek Prem Katha: धोंडी चंप्याच्या प्रेमकहाणीत येणार अफलातून गाणे, अनोख्या लव्हस्टोरीत येणार नवा ट्विस्ट

'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा धमाल विनोदी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता या चित्रपटातील जबरदस्त गाणीही प्रेक्षकांना वेड लावण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Chetan Bodke

Dhondi Champya- Ek Prem Katha Music Launch: 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा धमाल विनोदी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता या चित्रपटातील जबरदस्त गाणीही प्रेक्षकांना वेड लावण्यासाठी सज्ज झाले आहेत. नुकताच 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’चा म्युझिक लाँच सोहळा पार पडला. यावेळी भरत जाधव, वैभव मांगले, निखिल चव्हाण यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

या चित्रपटातील प्रत्येक गाणे वेगवेगळ्या जॉनरचे आहेत. अवधूत गुप्ते, वैशाली सामंत आणि सौरभ शेट्ये यांचा आवाज लाभलेल्या 'स्वॅगवाला रेडा' या अफलातून गाण्याला गणेश निगडे यांचे बोल लाभले आहेत. तर 'हलके हलके रेशमी' या प्रेमगीताला गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध केले असून सौरभ शेट्ये आणि सना मोइदुट्टी यांनी स्वरबद्ध केले आहे.

चित्रपटात एका बाजूला धोंड्या आणि चंप्याची जगावेगळी अनोखी प्रेमकहाणी खुलत आहे, तर आदित्य- ओवीच्या प्रेमकहाणीतील ट्विस्ट गाण्यातून बहरत असल्याचे दिसून येत आहे. तर मंदार चोळकर लिखित 'श्वास कसा हा' या गाण्याला सौरभ शेट्ये आणि सना मोइदुट्टी यांनी गायले आहे. या सर्व गाण्यांना सौरभ - दुर्गेश यांचे संगीत लाभले आहे. तर या गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन सुजित कुमार, सिद्धेश दळवी यांनी केले आहे.

चित्रपटातील गाण्यांबद्दल दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर म्हणतात, "चित्रपटातील प्रत्येक गाणे वेगवेगळ्या भावना तयार करते. आमची म्युझिक टीम एकदम झक्कास असल्याने प्रत्येक गाण्याची एक वेगळीच खासियत आहे. चित्रपटातील प्रत्येक गाणे वेगवेगळ्या धाटणीचे आहेत. 'स्वॅगवाला रेडा' हे गाणे पाहायला जितके गंमतीशीर वाटते, तितकेच ते ऐकायलाही मजा येते. ज्याप्रमाणे प्रेक्षकांनी ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद या गाण्यांनाही देतील."

रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत सुनील जैन आणि कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित 'धोंडी चंप्या - एक प्रेम कथा' हा चित्रपट प्रभाकर भोगले यांच्या लघुकथे वर प्रेरित होऊन बनवण्यात आला असून याची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांचे आहेत.

सुनील जैन, आदित्य जोशी, व्हेनिसा रॉय, आदित्य शास्त्री निर्माते असून अमित अवस्थी, सुशांत वेंगुर्लेकर हे सहनिर्माते आहेत. भरत जाधव, वैभव मांगले, निखिल चव्हाण, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका असून येत्या १६ डिसेंबरपासून धोंडी आणि चंप्याची प्रेमकहाणी प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT