Alyad Palyad Trailer Instagram
मनोरंजन बातम्या

Alyad Palyad Trailer : फिल्टर पाड्याच्या बच्चनच्या ‘अल्याड पल्याड'चा ट्रेलर रिलीज

Chetan Bodke

आपण जो विचार करतो त्यापलीकडे जाऊन आपल्या आजुबाजूला अनेक घटना घडत असतात. भीतीदायक वाटणाऱ्या घटनांमागचं नेमकं रहस्य काय असणार? याची उकल करताना थरार, उत्कंठा, शोध या सगळ्या नजरबंदीच्या खेळातून अनुत्तरित प्रश्नांचा शोध घेणारा एस.एम.पी प्रोडक्शन् अंतर्गत ‘अल्याड पल्याड' हा थरारपट १४ जूनला प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली असून दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यांचे आहे. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड' चित्रपटात आहेत.

रहस्यमय गोष्टींचे सुप्त आकर्षण प्रत्येकाला असतेच. पोस्टरपासूनच उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘अल्याड पल्याड’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच संपन्न झाला. प्रदर्शित झालेल्या या ट्रेलर मधून जबरदस्त झलक दिसून येत आहे. अल्पावधीतच हा ट्रेलर ट्रेंडिंगला आला आहे.  

दुर्गम भागातल्या एका गावाची, तिथल्या माणसांची रहस्यमय कथा असलेला ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे.एका रहस्याची उकल करताना त्यांच्या भोवती वेगवेगळ्या धक्कादायक घटनांची मालिका सुरु होते.

सरतेशेवटी एकदम ध्यानीमनी नसलेली गोष्ट समोर येते. या घटनेची  उकल कशी होते ? सत्य काय आहे? उत्कंठा, शोध, यातून कोणतं ‘रहस्य’ उलगडणार? हे ‘अल्याड पल्याड' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा प्रयत्न आम्ही केला असून हे ‘रहस्य’ प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल असा विश्वास दिग्दर्शक प्रीतम एस.के. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu Kashmir Exit Polls : जम्मू-काश्मीरमध्ये येणार 'इंडिया आघाडी'चं सरकार, भाजपला बसणार धक्का? जाणून घ्या EXIT POLL चा अंदाज

Marathi News Live Updates :हरियाणात १० वर्षांनंतर काँग्रेस रिटर्न, जम्मूत भाजपची सत्ता; एक्झिट पोलचे आकडे आले

Navratri 2024: देवीला दाखवा हा नैवेद्य; इच्छा होतील पूर्ण

Haryana Election Exit Poll : हरियाणात १० वर्षांनंतर काँग्रेसचं सरकार? भाजपची हॅट्ट्रिक हुकणार, जाणून घ्या Exit Poll चे अंदाज

VIDEO : राज ठाकरे आपल्याच कार्यकर्त्यांवर संतापले; पाहा काय आहे कारण

SCROLL FOR NEXT