Tejaswini Lonari Viral Photo Saam TV
मनोरंजन बातम्या

Tejaswini Lonari Viral Photo: तेजस्विनीचा 'अफलातून' लूक, चित्रपटातील फोटो झाला व्हायरल

Marathi Movie Aflatoon Tejaswini Lonari Photos: तेजस्विनीचा 'अफलातून' लूक, चित्रपटातील फोटो झाला व्हायरल

साम टिव्ही ब्युरो

Tejaswini Lonari Viral Photo: मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिचा बेधडक डॅशिंग अंदाज लवकरच पहायला मिळणार आहे. वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर तेजस्विनी पोलिसी गणवेश चढवत आगामी ‘अफलातून’ या मराठी चित्रपटात आलिया सावंत या डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

साहा अँड सन्स स्टुडिओज,आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी निर्मित ‘अफलातून’ हा चित्रपट येत्या २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'अ डिफेक्टीव्ह कॅामेडी' असं म्हणत लेखक, दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना तेजस्विनी सांगते की, 'माझं यातलं व्यक्तिमत्व गोवन आहे. शांत, संयमी पण वेळप्रसंगी आपला खाक्या दाखवत चोख कामगिरी बजावणारी पोलीस अधिकारी आहे. माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका मला करायला मिळाल्याचा आनंद आहे. विशेष म्हणजे गोव्याची भाषा, त्याचा लहेजा हे सगळं करण्यात एक वेगळीच मजा आली. प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा ‘अफलातून’ हा चित्रपट आहे.

साहा अँड सन्स स्टुडिओज,आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी आणि राजीव कुमार साहा चित्रपटाचे निर्माते आहेत. ग्रुप एम मोशन एंटरटेन्मेन्ट, अवधूत डिस्ट्रिब्युटर आणि स्वर्ण पट कथा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अफलातून’ चित्रपटाची सहनिर्मिती करण्यात आली आहे.

अफलातून’ चित्रपटाची कथा-पटकथा परितोष पेंटर यांची असून संवाद संदीप दंडवते यांचे आहेत. छायांकन सुरेश देशमाने तर संकलन सर्वेश परब यांचे आहे. मंदार चोळकर याने लिहिलेल्या गीतांना अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीताची जबाबदारी संगीतकार कश्यप सोमपुरा यांनी सांभाळली असून पार्श्वसंगीत कश्यप सोमपुरा आणि मलिक वार्सी यांचे आहे.  (Latest Entertainment News)

चित्रपटाच्या संगीताचे हक्क सारेगामाकडे आहेत. नृत्यदिग्दर्शन रंजू वर्गीस, वेशभूषा मीनल डबराल गज्जर, कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे. वितरणाची जबाबदारी ए.ए फिल्म्स ने सांभाळली आहे. मंगेश जगताप, सेजल पेंटर, शीला जगताप, अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर सहनिर्माते आहेत. ऑनलाईन निर्माते अवधूत डिस्ट्रीब्युटर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli Investment Scam: डोंबिवलीतील ‘फिनिक्स इन्व्हेस्टमेंट’ घोटाळा उघड; शंभराहून अधिक गुंतवणूकदारांची 5,00,00,000 फसवणूक|VIDEO

Manoj Jarange: ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा शेतकऱ्यांना सरसकट १०० टक्के मदत करा, जरांगेंच्या ४ मागण्या

Cancer: कॅन्सरची ही लक्षणं शरीरात लपलेली असतात

Curly Hair Care: कुरळ्या केसांसाठी कधीच वापरू नका या ७ गोष्टी, नाहीतर तुमचे केसं कायमचे होतील कोरडे आणि निर्जीव

Cyclone Alert! धोक्याचा इशारा! २४ तासात चक्रीवादळ धडकणार, IMD चा नवा अलर्ट काय?

SCROLL FOR NEXT