२०२३ हे वर्ष मराठी सिनेरसिकांसाठी खूपच खास ठरले. या वर्षात मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अनेक दमदार चित्रपट प्रदर्शित झाले. आता येत्या नव्या वर्षात (New Year) देखील चांगला कंटेट असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. यापैकी एक चित्रपट म्हणजे '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!' (8 Don 75 Movie) या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा असून प्रेक्षक चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटातील नवं गाणं 'एन्जॉय एन्जॉय' प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
'एन्जॉय एन्जॉय'या गाण्याद्वारे तुम्ही नव्या वर्षाच्या स्वागत करू शकता. नव वर्षाच्या स्वागतासाठी या गाण्यावर नाचण्याचा तुम्हाला पुरेपूर आनंद मिळणार आहे. ८ या चित्रपटामध्ये अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री प्रियंका जाधव हे मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यावर आधारीत हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!' हा चित्रपट नव्या वर्षात १९ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
'८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!' हा चित्रपट एका महत्त्वाच्या विषयावर आधारित आहे. या चित्रपटातील नुकताच प्रदर्शित झालेलं 'एन्जॉय एन्जॉय' हे गाणं आयुष्य साजरं करण्याचा संदेश देत आहे. गणेश निगडे यांनी लिहिलेल्या या गाण्याला सुहित अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केले आहे. तर आदर्श शिंदे आणि सुहित अभ्यंकर यांनी हे गाणं आपल्या सुंदर आवाजामध्ये गायलं आहे.
उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते यांनी '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!' या चित्रपटाची निर्माती केली आहे. तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. शर्वाणी - सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथालेखनाची, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी पार पाडली आहे.
या चित्रपटामध्ये अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्यासह शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी ऐवढी मोठी स्टारकास्ट एकत्र पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.