Vaalvi Box Office Collection Instagram/ @zeestudiosofficial
मनोरंजन बातम्या

Vaalvi Box Office Collection: बॉलिवूड चित्रपटांसमोर 'वाळवी'ची दमदार कमाई, तिसऱ्या आठवड्यातही घवघवीत यश...

'पठान' सारखा बिग बजेट चित्रपट शर्यतीत असतानाही 'वाळवी' चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यातही आपले स्थान कायम ठेवले आहे.

Chetan Bodke

Vaalvi Box Office Collection: १३ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर तिसरा यशस्वी आठवडा असून प्रेक्षकांचा या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. 'पठान' सारखा बिग बजेट चित्रपट शर्यतीत असतानाही 'वाळवी' चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यातही आपले स्थान कायम ठेवले आहे.

यावरूनच मराठी प्रेक्षक 'वाळवी'ला पसंती देत आहेत. या आठवड्यातही काही थिएटरमध्ये 'वाळवी'चे शोज तिप्पट पटीने वाढवण्यात आले आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा होती. समीक्षक, मराठी सिनेसृष्टी, प्रेक्षक अशा सर्वांनीच 'वाळवी'चे भरभरून कौतुक केले.

प्रेक्षकांकडून भरभरून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, "तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद समाधान देणारा आहे. अनेक ठिकाणी प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आणि प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून 'वाळवी'चे शोज वाढवण्यात आले आहेत. सध्या 'पठान' सारख्या बॉलिवूड चित्रपटाची चलती असतानाही 'वाळवी’वरही प्रेक्षक तेवढेच प्रेम करत आहेत."

"हिंदी चित्रपटासमोर मराठी चित्रपट ताकदीने उभा आहे, हेच खूप आनंददायी आहे. मुळात मराठी प्रेक्षकवर्ग हा चोखंदळ आहे. चांगल्या कॅान्टेटला ते नेहमीच पसंती देतात आणि म्हणूनच ते असे चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघतात. झी स्टुडिओज नेहमीच नाविन्यपूर्ण विषय प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहे. 'वाळवी' हा सुद्धा असाच वेगळा विषय असून हा मराठीतील पहिला थ्रिलकॉम चित्रपट आहे. आतापर्यंत बॉक्स ऑफिसवरील 'वाळवी'ला मिळणारा प्रतिसाद पाहता 'वाळवी' प्रेक्षकांचे प्रेम मिळवण्यात यशस्वी झाला आहे."

झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी 'वाळवी'ची निर्मिती केली असून या चित्रपटाची कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

SCROLL FOR NEXT