Bhaurav Karhade On Chala Hawa Yeu Dya Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bhaurav Karhade Allegation : “चला हवा येऊ द्या च्या निर्मात्यांकडे विनंती केली होती, पण...” म्हणत TDMच्या दिग्दर्शकांनी केले आरोप

नुकतंच भाऊराव कऱ्हाडेंनी दिलेल्या मुलाखतीत एका लोकप्रिय शोवर त्यांनी आरोप लावले आहेत.

Chetan Bodke

Bhaurav Karhade On Chala Hawa Yeu Dya: ख्वाडा, बबन दिग्दर्शित भाऊराव कऱ्हाडे सध्या त्यांच्या आगामी चित्रपटांमुळे कमालीचे चर्चेत आहे. सध्या महाराष्ट्रात ‘टीडीएम’ चित्रपटावरून कमालीचे वादंग सुरू आहे. चित्रपटाला पुरेशा स्क्रिन्स न मिळाल्याने दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंनी एका थिएटरमध्ये जाऊन आपली खंत व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत चित्रपटातील टीमदेखील उपस्थित होती. नुकतंच भाऊराव कऱ्हाडेंनी दिलेल्या मुलाखतीत एका लोकप्रिय शोवर त्यांनी आरोप लावले आहेत.

एका मुलाखतीत दिग्दर्शकांनी टेलिव्हिजनवरील एक प्रसिद्ध शो ‘चला हवा येऊ द्या’विषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. भाऊराव यांनी एका मुलाखतीमध्ये चला हवा येऊ द्या वर टीका केली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनकरिता आम्ही त्यांना विनंती केली होती. मात्र ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमकडून कोणताही प्रतिसाद आला नसल्याची माहिती भाऊराव कऱ्हाडेंनी सांगितलं. या कार्यक्रमात आता हल्ली मराठी सोबत अनेक बॉलिवूड चित्रपट देखील येतात. अनेक कलाकारांच्या मते, आपला चित्रपट जर ‘चला हवा येऊ द्या’मध्ये गेला तर तो नक्कीच हिट होईल असं अनेक सेलिब्रिटींचं मत आहे. (Latest Entertainment News)

‘चला हवा येऊ द्या’च्या निर्मात्यांनी भाऊसाहेब कऱ्हाडेंच्या टीमला नाकारल्यानं प्रेक्षकांमध्ये नाराजी आहे. भाऊराव म्हणतात, मला जेव्हा ख्वाडासाठी नॅशनल अॅवॉर्ड मिळालं होतं, तेव्हा त्यांनी बोलावलं होतं. त्यानंतर मला ते बबनच्यावेळी बोलावतील अशी इच्छा होती, पण तसं काही झालं. TDM चित्रपटावेळी मी ‘चला हवा येऊ द्या’च्या निर्मात्यांकडे विनंती केली होती. पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. दीड महिन्यांपासून मी त्यांच्या संपर्कात होतो मला त्यांनी बोलावले नाही. अशी प्रतिक्रिया कऱ्हाडे यांनी दिली आहे. (Marathi Film)

मराठी चित्रपटांच्या वाट्याला वाईट दिवस आले आहेत, मराठी चित्रपटांना पुरेशा प्रमाणात स्क्रिन्सच मिळत नसल्याची खंत कऱ्हाडे यांनी व्यक्त केली होती. मराठी चित्रपटांना पुरेशा स्क्रिन्स उपलब्ध होत नसल्याने आपण पुढे चित्रपट तयार करायचा की नाही याचा गांभीर्यानं विचार करु असे देखील यावेळी भाऊराव कऱ्हाडे म्हणाले. चित्रपटाच्या पूर्ण टीमनं याविषयी सोशल मीडियावर स्क्रिन्स न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली होती. (Marathi Actors)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

SCROLL FOR NEXT