Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil Teaser You Tube
मनोरंजन बातम्या

Sangharsh Yoddha Teaser: 'संघर्षाची धगधगती मशाल हाती घेऊन...'; मनोज जरांगे पाटलांच्या 'संघर्ष योद्धा'चा टीझर रिलीज

Manoj Jarange Patil Biopic Teaser: मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा मुद्दा उचलून धरून गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष करणारे मराठा समजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायाला मिळणार आहे.

Chetan Bodke

Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil Teaser

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं हा मुद्दा उचलून धरून गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष करणारे मराठा समजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायाला मिळणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध 'संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील' (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) या चित्रपटातून घेतला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी डी गोवर्धन दोलताडे यांनी हा चित्रपट तयार करण्याची घोषणा केली होती. नुकताच या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांना मराठा समजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास येत्या २६ एप्रिल पासून 'संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील' या चित्रपटातून पाहता येणार आहे. (Marathi Film)

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या बऱ्याच दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. आंतरवाली सराटीपासून सुरू झालेला हा प्रवास आपल्याला चित्रपटामध्ये दिसणार आहे. शेअर केलेल्या टीझरमध्ये त्यांनी केलेले उपोषणाचे आणि घेतलेल्या सभांचे प्रोमो आपल्याला दिसत आहेत. लाखोंची गर्दी, उधळला जाणारा गुलाल चित्रपटात टिपला गेला आहे. त्यासोबतच मनोज जरांगे पाटील यांना राज्यभरातून मिळालेला तुफान प्रतिसादही टीजरमध्ये दिसतोय. चित्रपटाच्या टीझरला अवघ्या काही मिनिटांतच हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. चाहते चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक असल्याचे दिसत आहे. (Manoj Jarange Patil)

सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे, कार्तिक दोलताडे, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर, शिवाजी दोलताडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा केली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. चित्रपटात प्रमुख भूमिका, अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके यांच्या आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT