Krantijyoti Vidyalay Saam Tv
मनोरंजन बातम्या

Krantijyoti Vidyalay: साऊथ-हिंदी चित्रपटांना मागे टाकत 'क्रांतिज्योती विद्यालय'ची घोडदौड; सकाळी ७ ते रात्री १२चे सगळे शो हाऊसफुल

Krantijyoti Vidyalay: हेमंत ढोमे दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ बॉक्स ऑफिसवर जोरदार गाजत आहे. या चित्रपटाचे सकाळी ७ ते रात्री १२चे सगळे शो हाऊसफुल सुरु आहेत.

Shruti Vilas Kadam

Krantijyoti Vidyalay: मराठी शाळेच्या वास्तवाशी जोडलेली आणि भावनिक नाळ निर्माण करणारी कथा मांडणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे. सकाळी ७ वाजताचा पहिला शो असो वा रात्री १२ वाजताचा शेवटचा शो, दोन्ही वेळांना चित्रपटगृहं हाऊसफुल भरताना दिसत आहेत. हिंदी आणि दाक्षिणात्य बिग बजेट चित्रपटांच्या स्पर्धेतही या मराठी चित्रपटाने आपले स्थान ठामपणे अधोरेखित केले आहे.

अनेक चित्रपटगृहांमध्ये (सिंगल स्क्रीन) इतर चित्रपटांचे शो कमी करून ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चे शो वाढवले जात आहेत. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात ६.१४ कोटींची उल्लेखनीय कमाई केली असून, दुसऱ्या आठवड्यात या यशाला आणखी वेग मिळाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. मराठी आशयप्रधान चित्रपटासाठी हा प्रतिसाद विशेष मानला जात असून, बुकिंग प्लॅटफॉर्मवरही चित्रपट सतत ट्रेंडिंगमध्ये आहे.

अनेक चित्रपटगृहांमध्ये (सिंगल स्क्रीन) इतर चित्रपटांचे शो कमी करून ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चे शो वाढवले जात आहेत. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात ६.१४ कोटींची उल्लेखनीय कमाई केली असून, दुसऱ्या आठवड्यात या यशाला आणखी वेग मिळाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. मराठी आशयप्रधान चित्रपटासाठी हा प्रतिसाद विशेष मानला जात असून, बुकिंग प्लॅटफॉर्मवरही चित्रपट सतत ट्रेंडिंगमध्ये आहे.

प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चित्रपटाचे भरभरून कौतुक होत आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे, कलाकारांची कामगिरी, संगीत आणि कथानक यांची विशेष दखल प्रेक्षक घेत आहेत. “हेमंत ढोमे यांनी अत्यंत उत्कृष्ट चित्रपट दिला आहे,” “शाळेतील आठवणी पुन्हा जिवंत झाल्या,” “मराठी भाषा व मराठी शाळेची गळचेपी कोणताही अतिरेक न करता प्रभावीपणे मांडली आहे,” अशा प्रतिक्रिया सातत्याने व्यक्त होत आहेत. चित्रपटाची संवेदनशील मांडणी प्रेक्षकांना भावुक करून असल्याचे अनुभव अनेकांकडून समोर येत आहेत.

या यशाबद्दल लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “मराठी प्रेक्षक दर्जेदार आणि आशयपूर्ण चित्रपटाला नेहमीच मनापासून साथ देतो. ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ला मिळणारा प्रतिसाद प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर अपेक्षेपलीकडचा आहे. इतका मोठा आणि सातत्यपूर्ण प्रतिसाद आम्ही कल्पनाही केली नव्हती. सकाळपासून रात्रीपर्यंत हाऊसफुल शो, प्रेक्षकांच्या डोळ्यात दिसणारी भावुकता आणि चित्रपटानंतर मिळणाऱ्या प्रतिक्रिया हे सगळं अत्यंत भारावून टाकणारं आहे. चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन देण्याची संस्कृती हीच मराठी चित्रपटसृष्टीची खरी ताकद आहे. या प्रेमाने संपूर्ण टीमला नव्या उमेदीने पुढे काम करण्याचं बळ दिलं आहे.”

क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट सध्या प्रदर्शित असून यात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट झळकत आहे. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले असून, क्षिती जोग निर्माती आहेत. सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT