Journey Marathi Film Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Journey Poster: आयुष्याच्या प्रवासाची अनुभूती घडवणारा ‘जर्नी’चं पोस्टर प्रदर्शित; पाठमोहरा उभा राहिलेला नेमका अभिनेता कोण?

Journey Marathi Film Poster: नात्याचा आणि आयुष्याचा अर्थ शिकवणाऱ्या या ‘जर्नी’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे.

Chetan Bodke

Marathi Film Poster: सचिन दाभाडे फिल्म प्रस्तुत, सचिन जीवनराव दाभाडे निर्मित, दिग्दर्शित ‘जर्नी’ चित्रपट येत्या सप्टेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे.

नात्याचा आणि आयुष्याचा अर्थ शिकवणाऱ्या या ‘जर्नी’मध्ये शुभम मोरे, माही बुटाला, निखिल राठोड या बालकलाकारांची प्रमुख भूमिका असून याव्यतिरिक्त या चित्रपटात शंतनू मोघे, शर्वरी जेमेनीस, अंजली उजवणे, योगेश सोमण, ओमकार गोवर्धन, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने प्रशांत तपस्वी यांच्याही मुख्य व्यक्तिरेखा आहेत. रवींद्र मठाधिकारी लिखित या चित्रपटाची कथा सचिन दाभाडे यांची आहे. तर भास्कर देवेंग्रेकर, तानाजी माने, संतोष राठोड, अनिकेत अरविंद बुटाला सहनिर्माते आहेत.

प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो. मग तो पर्यटनासाठीचा असो अथवा आयुष्याचा. या प्रवासात अनेक चढउतार असतात. अनेक गोष्टींचे महत्व आपल्याला या दरम्यान कळते. आयुष्याच्या या प्रवासाचा अनुभव देणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या पोस्टरमध्ये एक लहान मुलगा पाठमोरा उभा दिसत आहे.

त्याचा आयुष्यातील एक अविस्मरणीय प्रवास आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्याची ही ‘जर्नी’ त्याला कोणत्या वळणावर नेणार, हे लवकरच कळणार आहे. या चित्रपटाच्या वितरणाची धुरा बॅाक्स हिट मुव्हिजच्या अनुप जगदाळे आणि मोनालिसा बागलने सांभाळली आहे.

दिग्दर्शक सचिन जीवनराव दाभाडे या चित्रपटाबद्दल म्हणतात, “चित्रपटात दाखवण्यात आलेली जर्नी म्हणजेच कुटुंबाशी, नात्यांशी आणि स्वतःशी असलेली लढाई आहे. या लढाईत अनेक भावना, गोष्टी उलगडत आहेत. एका लहान मुलाच्या आयुष्यातील हा प्रवास असून प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बनावट ऑनलाईन अ‍ॅप प्रकरणात चौकशीत नसतानाही शेटे यांचे आत्महत्येचं पाऊल

Divya Deshmukh Chess World Cup : दिव्या देशमुख बनली वर्ल्ड चॅम्पियन! नागपूरच्या १९ वर्षीय लेकीनं घडवला इतिहास

Brain Exercises: मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी करा 'या' ब्रेन ॲक्टिव्हिटिज

Thane Traffic : घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली; जाणून घ्या कारण

Gokak Waterfalls: सांगलीपासून २ तासांच्या अंतरावर आहे 'हा' धबधबा; गर्दी नको असेल तर आहे परफेक्ट डेस्टिनेशन

SCROLL FOR NEXT