Jhimma 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jhimma 2: 'झिम्मा २'ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम, बॉलिवूडच्या चित्रपटांना देतोय टक्कर

Jhimma 2 Box Office Collection: हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Priya More

Jhimma 2 Movie:

मराठी सिनेरसिकांनासाठी यंदाचा वर्ष खूपच खास ठरलं. या वर्षात एकापेक्षा एक जबरदस्त मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या वर्षाअखेरीला देखील काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहेत. नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'झिम्मा २' चित्रपटाची (Jhimma 2 Movie) बॉक्स ऑफिसवर जादू पाहायला मिळत आहे.

हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरबाहेर मोठी गर्दी करत आहेत. अनेक शो हाऊसफूल होत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बॉलिवूडचे 'अ‍ॅनिमल' आणि 'सॅम बहादूर' हे चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आले. बॉलिवूडचे हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले असतानाही हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादू कायम दिसत आहे. 'झिम्मा २' चित्रपट या चित्रपटांना टक्कर देताना दिसत आहे. तिसऱ्या यशस्वी आठवड्यातही ही 'झिम्मा २'ची टूर सुसाट सुटली आहे. इतकेच नाही तर आता या चित्रपटाचे शोजही वाढवण्यात आले आहेत. कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसत आहेत.

चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या भरभरून प्रेमाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमेने सांगितले की, 'खूप छान वाटतेय. एवढा उदंड, भरभरून प्रतिसाद मिळेल, असे खरोखर वाटले नाही. प्रेक्षक आपले खास दिवस 'झिम्मा २'बघून साजरे करत आहेत. २-३ वेळा चित्रपट पाहायला आलेले प्रेक्षकही अनेक आहेत. खूप छान वाटतेय. खरंतर 'झिम्मा २'ला प्रेक्षक कसे स्वीकारतील, याबद्दल मनात जरा भीतीच होती. कारण 'झिम्मा'ला प्रेक्षकांनी खूप मोठे केले होते. त्यामुळे हा चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील, प्रेक्षकांना हा आवडेल का, असे अनेक प्रश्न मनात होते.'

हेमंत ढोमेने पुढे सांगितले की, 'याशिवाय 'झिम्मा २' सोबत बॉलिवूडचे काही मोठे सिनेमेही प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे जरा दडपण होते. परंतु आता दोन आठवडे झाले आहेत. प्रेक्षक आजही 'झिम्मा २'ला पसंती देत आहेत. या चित्रपटांसोबत 'झिम्मा २' स्पर्धा करतोय आणि हे भारी फीलिंग आहे. आपला चित्रपट यशस्वी दुसरा आठवड्यानंतर आता तिसऱ्या आठवड्यात पदार्पण करत आहोत. शोजही वाढले आहेत. त्यामुळे आशा आहे की हा आठवडाही असाच हाऊसफुल्ल जाईल. अर्थात हे सगळे यश माझ्या एकट्याचे नसून संपूर्ण टीमचे आहे. आनंद एल. राय, क्षिती जोग आणि जिओ स्टुडिओजची साथ लाभल्यानेच आम्ही हा पल्ला गाठू शकलो.', असा विश्वास त्याने व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT